मुंबई 5 जून : अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही विविध कारणांसाठी चर्चेत राहते. याशिवाय ती तिच्या सोशल मीडियावर फार सक्रिय असते. व निरनिराळ्या पोस्ट शेअर करत असते. अनेकदा ती मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते. आताही तिने एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. तो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सारा ही नेहमी निरनिराळ्या ठिकाणी भटकंतीसाठी गेली असता तेथील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तर यावेळी तिने एक मजेशीर व्हिलॉग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने अगदी रंजक पद्धतीने यमक जुळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीच क्षणात व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तिला अनेक कमेंट्सही आल्या.
व्हिडीओत ती म्हणते, “नमस्ते दर्शको.. जैसे की आप सुनते है, ये है पानी की ध्वनी.. इट इस सो ब्युटीफूल ओह सो सनी..द ऐर इझ लव्हली, स्वीट ऍज हनी..प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राइब इफ यु थिंक आय ऍम फनी.” यानंतर तिच्यावर हस्याचा पाऊस पडायला सुरुवात झाली. व तु खरच फनी असल्याचही अनेकांनी म्हटलं.
अनिता भाभीचा ग्लॅमरस अवतार; Photo पाहून मिळेल Fashion Inspirationअनेकांनी तिच्या या व्हिडीओ नुसार गमतीशीर रित्या यमक जुळवण्याचेही प्रयत्न केले. तर काहीच मीनिटांत व्हिडीओला लाखो व्हूज ही मिळाले. काहींनी म्हटलं सारा तु खरचं फनी आहेस, तर काहींना साराचा हा मिश्किलपणा फारच भावला. (Sara Ali Khan funny video) सारा अनेकदा असे व्हिडीओ पोस्ट करते. काही दिवसांपूर्वी तिने काश्मिर ट्रिप आपल्या आई आणि भावासोबत केली होती. तेव्हाही तिने अनेक गमतीशीर व्हिडीओ पोस्ट केले होते. याशिवाय साराने नुकताच एक फोटोही पोस्ट केला आहे. ज्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. साराची सोशल मीडियावर मोठी फॅनफॉलोइंग आहे. अगदी कमी काळातच तिने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.