JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बापरे! Hair Transplant साठी संजय जाधवनं खर्च केले इतके लाख

बापरे! Hair Transplant साठी संजय जाधवनं खर्च केले इतके लाख

आज संजयचा वाढदिवस आहे. (Sanjay Jadhav birthday) त्यानिमित्तानं जाणून घेऊया त्याने आपल्या डोक्यावर केस लावण्यासाठी किती लाखांचा खर्च केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 18 जुलै**:** चित्रपटांच्या चंदेरी दुनियेत चमकायचं असेल तर लुक्स आणि सौंदर्य यावर देखील लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी आपलं तारुण्य टिकवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी (Plastic surgery), हेअर ट्रान्सप्लान्ट (Hair Transplant) यांसारख्या पर्यायांचा आधार घेतात. अशा सर्जरी करणाऱ्या कलाकारांच्या यादीत आता मराठी दिग्दर्शक, अभिनेता संजय जाधवचं (Sanjay Jadhav) नाव देखील जोडलं गेलं आहे. त्याने देखील आपलं टक्कल लपवण्यासाठी हेअर ट्रान्सप्लान्ट करून घेतलं. आज संजयचा वाढदिवस आहे. (Sanjay Jadhav birthday) त्यानिमित्तानं जाणून घेऊया त्याने आपल्या डोक्यावर केस लावण्यासाठी किती लाखांचा खर्च केला. प्रियांका चोप्रानं 20 वर्षात जमवली इतकी संपत्ती; आकडा बघून तुम्हालाही बसेल शॉक संजयने केवळ डोक्याच्या वरच्या भागापुरतेच केस लावले आहेत. गरज पडल्यास त्याला ते कृत्रिम केस काढताही येतात. संजयच्या या नव्या लुकमुळे त्याच्यामध्ये बराच फरक जाणवतोय. त्याचा हा नवा लुक लक्ष वेधणारा आहे यात शंका नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या या नव्या लुकसाठी संजयनं जवळपास 25 लाख रुपये खर्च केले आहेत. हेअर ट्रान्सप्लान्ट सर्जरीसाठी तो खास अमेरिकेत गेला होता असं म्हटलं जातं. ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी या नव्या लुकसह त्याने सर्वांनाच चकित केलं होतं. शिवा काशिद साकारणं किती कठीण होतं? विशालनं सांगितला ‘जय भवानी जय शिवाजी’चा अनुभव हेअर ट्रान्सप्लान्ट कसं केलं जातं**?** हेअर ट्रान्सप्लान्ट या सर्जरीला मराठीत केस प्रत्यारोपण असंही म्हटलं जातं. या प्रक्रियेत मानेच्या मागच्या बाजूचे केस काढून त्यांची सूक्ष्मदुर्बिणीखाली तपासणी केली जाते. यातील योग्य केसांचे तुकडे करून एक एक करत डोक्यावर प्रत्यारोपण केले जाते. प्रत्यारोपणासाठी 3 लाख ते 50 लाखांपर्यंतचा खर्च येतो. हा खर्च डॉक्टर आणि रुग्णालयानुसार कमी जास्त प्रणात होतो. एका संशोधनानुसार भारतात महिन्याला सुमारे 100 लोक केस प्रत्यारोपण करून घेतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या