मुंबई 16 जुलै**:** ‘समांतर’ (Samantar 2) या वेब सीरिजचा दुसरा सीझन नुकताच प्रदर्शित झाला. पहिल्या सीझनप्रमाणेच किंबहुना पहिल्यापेक्षा अधिक धुमाकूळ हा दुसरा सीझन घालताना दिसत आहे. गूढ कथानक आणि स्वप्नील जोशी-तेजस्वीनी पंडीतची (Swapnil Joshi Tejaswini Pandit) बोल्ड केमिस्ट्री यामुळे ही सीरिज सुपरहिट ठरली. लक्षवेधी बाब म्हणजे समांतर 2 ही OTT प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिली गेलेली पहिली मराठी वेब सीरिज आहे. अगदी काही दिवसातील 56 दशलक्षपेक्षा अधिक प्रेक्षकांनी या सीरिजचा आनंद घेतला. स्वप्निल जोशीनं इन्स्टाग्रामद्वारे ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. सोबतच त्यानं सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभारही मानले आहेत. तो म्हणाला, “समांतर-2’ला भरभरून यश मिळणार याबाबत आम्हाला खात्री होती, कारण यातील सर्वच गोष्टी अचूकपणे जुळून आल्या आहेत. दुसऱ्या भागाला जो प्रतिसाद मिळतो आहे, त्याने मला खूप आनंद झाला आहे. मला याचाही आनंद आहे की मी माझ्या करियरमध्ये जे नवीन प्रयोग करत आहे त्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद लाभतो आहे. या सर्व यशाचे श्रेय खासकरून निर्माते अर्जुन आणि कार्तिक यांना तसेच दिग्दर्शक समीर विद्वांस यांना आहे. त्यांनी सर्जनशिलतेच्या बाबतीत जे श्रम घेतले आणि चित्रीकरणाच्या बाबतीत जो दर्जा सांभाळला त्याला तोड नाही,” ‘माझं Toofan पाहून जळतील’; मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं bollywood अभिनेत्रींना चॅलेंन्ज
मुलाच्या डेब्यू चित्रपटात मिथुन चक्रवर्तींची खास entry; PHOTO झाले VIRAL समांतर या सीरिजद्वारे स्वप्नील जोशीनं OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. ही सीरिज नामांकित मराठी लेखक सुहास शिरवळकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित आहे. दोन भिन्न व्यक्ती व्यक्तीचं आयुष्य एकाच हस्तरेखेवर आधारित आहे. म्हणजे यामध्ये एकाचा भूतकाळ हा दुसऱ्याचा भविष्यकाळ दाखवण्यात आला आहे. गूढ कथानक, जबरदस्त अभिनय आणि तितक्याच ताकतीच दिग्दर्शन यामुळं ही सीरिज तुफान गाजली.