मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मुलाच्या डेब्यू चित्रपटात मिथुन चक्रवर्तींची खास entry; PHOTO झाले VIRAL

मुलाच्या डेब्यू चित्रपटात मिथुन चक्रवर्तींची खास entry; PHOTO झाले VIRAL

अभिनेता मिथुन चक्रवर्तींचा लहान मुलगा नमाशी चक्रवर्ती(Namashi Chakrborty) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नमाशी ‘बॅड बॉय’ (Bad Boy) या चित्रपटात झळकणार आहे.

अभिनेता मिथुन चक्रवर्तींचा लहान मुलगा नमाशी चक्रवर्ती(Namashi Chakrborty) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नमाशी ‘बॅड बॉय’ (Bad Boy) या चित्रपटात झळकणार आहे.

अभिनेता मिथुन चक्रवर्तींचा लहान मुलगा नमाशी चक्रवर्ती(Namashi Chakrborty) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नमाशी ‘बॅड बॉय’ (Bad Boy) या चित्रपटात झळकणार आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 16 जुलै- बॉलिवूडचे (Bollywood) ‘डिस्को डान्सर’ म्हणून अभिनेता मिथुन चक्रवर्तीना (Mithun Chakrborty) ओळखलं जातं. अभिनेता मिथुन चक्रवर्तींचा लहान मुलगा नमाशी चक्रवर्ती (Namashi Chakrborty) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नमाशी ‘बॅड बॉय’ (Bad Boy) या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी करत आहेत. नुकताच या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये मिथुन चक्रवर्ती डान्स करताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मिथुन चक्रवर्ती आपल्या मुलाच्या डेब्यू फिल्ममध्ये गेस्ट अपीयरन्स करणार आहेत. यामध्ये ते एका गाण्यामध्ये झळकणार आहेत.

‘बॅड बॉय’ या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती मुख्य अभिनेता म्हणून तर अमरीन कुरैशी मुख्य अभिनेत्रीच्या रुपात दिसणार आहेत. या चित्रपटातील ‘जनाब-ए-अली’ या गाण्यामध्ये मिथुन चक्रवर्ती डान्स करताना दिसणार आहेत. हैद्राबादच्या रामोजी फिल्नसिटी मध्ये ‘जनाब-ए-अली’ या गाण्याचा शुटींग झालं आहे. या गाण्याची कोरियोग्राफी पियुष भगत आणि शाजीया सामजी यांनी केली आहे.

(हे वाचा:धक्कादायक! T-Seriesच्या भुषण कुमारावर 30 वर्षीय तरुणीच्या बलात्काराचा गंभीर आरोप  )

एनडीटीव्ही ने दिलेल्या वृत्तानुसार, दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी म्हटलं आहे, ‘कोरोना महामारीने या चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा निर्माण केला आहे. आम्ही लवकरात लवकर हा चित्रपट प्रदर्शित करू इच्छितो. तसेच अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या सारख्या उत्कृष्ट कलाकाराच्या चित्रपटातील एन्ट्रीमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीनचं वाढली आहे.

(हे वाचा: 'बालिका वधू' फेम अभिनेत्री सुरेखा सिक्री याचं दुखद निधन)

तसेच अभिनेता नमाशी चक्रवर्तीने म्हटलं आहे, ‘आज मी माझ्या आदर्श व्यक्तीबरोबर ऑफस्क्रीनसोबत ऑनस्क्रीनसुद्धा काम केलं. 3 राष्ट्रीय पुरस्कारासोबत 350 चित्रपटांचा मोठा अनुभव असणाऱ्या या महान कलाकाराने आमच्या चित्रपटाला आशीर्वाद दिला आहे. असं त्यान म्हटलं आहे. तर दुसरीकडे मुख्य अभिनेत्री अमरीन कुरैशीने म्हटलं आहे, ‘मी माझ्या पहिल्याच चित्रपटात इतक्या मोठ्या आणि डान्सचे प्रतिक असणाऱ्या मिथुन सरांसोबत काम केल्याचा मला आनंद आहे,आणि अभिमानसुद्धा आहे’.

First published:

Tags: Bollywood News, Mithun chakraborty