फरहान अख्तर हा बॉलिवूडमधील अत्यंत प्रयोगशिल अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो लवकरच तुफान हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
या चित्रपटात फरहान एका बॉक्सरच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे चाहते त्याचं हे नवं रूप पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकूर देखील झळकणार आहे. या चित्रपटासाठी ती देखील उत्सुक आहे. तुफानमधील तिचं काम पाहून मोठमोठ्या बॉलिवूड अभिनेत्री तिच्यावर जळू लागतील असं तिला वाटतं.
“अशा प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारणं हे अभिनेत्रींचं स्वप्न असतं. अन् तो ड्रीम रोल आता मला मिळाला आहे. मी या चित्रपटात जीव ओतून काम केलं आहे. मला खात्री आहे यामधील माझी भूमिका पाहून मोठमोठ्या अभिनेत्री माझ्यावर जळू लागतील.” असं मृणाल इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.
मृणालनं ‘विट्टी दंदु’ या मराठी चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. ‘सुपर 30’ आणि ‘बाटला हाऊस’ या चित्रपटामुळे ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती.