मुंबई 14 मे : सध्या देशभरात कोरोना लसीकरण (corona vaccination) सुरू आहे. 18 वर्षांवरील प्रत्येकाला लस घेण्यासाठी आवाहान केलं जात आहे. यात बॉलिवूड स्टार्सही मागे नाहीत. अनेक सेलिब्रिटींनी लसीचे डोस घेतले आहेत. तर आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) ही लस घेतली आहे. ईदच्या दिवशी सलमान लस घेण्यासाठी पोहोचला होता. मुंबईतील दादर भागातील एका रुग्णालयात सलमान ने लस घेतली. सलमानचा हा लसीचा दुसरा डोस होता. याआधी त्याने मार्च महिन्यात लस घेतली होती. पण विशेष म्हणजे सलमान ने रुग्णालयात प्रवेश करताच त्याचे चाहते नेहमी प्रमाणेच अती उत्साही झाले. तर काही मुलींनी ओरडून सलमान ला आवाज देण्याचा प्रयत्न केला. व “सल्लु लव्ह यु , सल्लु लव्ह यु” असं म्हटलं. पण सुरक्षा रक्षकांच्या घोळक्यात असलेला सलमान काहीही न बोलता निघून गेला.
यावेळी सलमान सोबत त्याचा भाऊ सोहेल खान (Sohail Khan) देखील लस घेण्यासाठी पोहोचला होता. याआधी अनेक सेलिब्रिटींनी कोरोना लसीकरण करून घेतलं आहे. यात अक्षय कुमार (Akshay Kumar), शिल्पा शिरोडकर, विवेक ऑबेरॉय (Vivek Oberoi), सैफ अलि खान (Saif Ali Khan), संजय दत्त (Sanjay Dutt) यांनीही लसीकरण केलं आहे.
कोण म्हणतं सलमानची जादू ओसरली? पहिल्याच दिवशी राधेनं विदेशात केली कोट्यवधींची कमाईसलमानचा नुकताच ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe: Your Most Wanted Bhai) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला जगभरातून उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटगृहे बंद असल्याकारणाने चित्रपट ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. पण प्रेक्षकांनी तरीही सलमानच्या चित्रपटाला प्रंचंड दाद दिल्याचं पहिल्याचं दिवशी पहायाला मिळालं. Zee5 वर चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र एकाच वेळी अनेक युझर्सनी चित्रपच पाहण्यासाठी लॉगिन केल्याने Zee5 चा सर्वर क्रॅश झाला होता. मात्र कालांतराने तो सुरळीत झाला.