मुंबई 14 मे : सलमान खानचा (Salman Khan) आपल्या चाहत्यांवर करिष्मा कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. भाईजानची जादू पुन्हा एकदा दिसली आहे. कारण सलमानच्या राधे ला प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी भरभरून प्रतिसाद दिला आहे. सलमानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe : Your Most Wanted Bhai) नुकताच प्रदर्शित झाला आहे. भारतात ओटीटीवर (OTT) चित्रपट दिसत असला तरीही भारताबाहेर मात्र विविध प्लॅटफॉरमवर चित्रपट पाहिला गेला.
13 मे ला ईदच्या मुहुर्तावर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भारतात तो zee5 च्या झी प्लेक्स (zee plex) वर प्रदर्शित करण्यात आला. पण पहिल्याच दिवशी अनेकांनी एकाच वेळी zee5 लॉगीन केल्याने zee5 चा सर्वर क्रॅश झाल्याचं पाहायाला मिळालं. त्यामुळे प्रेक्षकांनी उंदड प्रतिसाद दिल्याचं समजतं आहे. तर भारताबाहेर दुबई, ऑस्ट्रेलिया या देशातंही चित्रपट पाहिला गेला. युएईच्या (UAE) फर्स्ट ग्लोबल प्रिमियर मध्ये राधे ला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. समोर आलेल्या माहितीनुसार राधेने पहिल्याच दिवशी ओव्हरसिज मध्ये 2.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे भारताबाहेर राधेला मिळत असलेला प्रतिसाद उत्तम मानला जात आहे.
View this post on Instagram
भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे चित्रपटाला काही अंशी नुकसान सहन करावं लागेल असं वाटत होतं. मात्र काल zee5 वर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास 15 लाखाहूंन अधिक लॉगिन्स एकाच वेळी करण्यात आले आणि त्यामुळे zee5 चा सर्वरही क्रॅश झाला होता. तेव्हा भारतातही चित्रपटाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.
‘आणखी किती वजन कमी करु?’ 50 किलो कमी केल्यावरही झरीनला म्हणतात जाडी
तेव्हा आता येत्या काळात चित्रपट किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं. याशिवाय चित्रपटाला पायरसीचा (piracy) ही फटका सहन करावा लागत आहेत. अनेक ठिकाणी चित्रपट लिक झाल्याची बातमीही समोर येत आहे.
चिपटात सलमान व्यतिरिक्त अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani), जॅकी श्रॉफ (Jacky Shroff), रणदीप हुडा (Randeep Hooda) यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Entertainment, Salman khan