JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मलिष्काला हवीये नीरज चोप्राकडून 'जादू की झप्पी'; RJ च्या या मुलाखतीमुळे संतापले युजर्स

मलिष्काला हवीये नीरज चोप्राकडून 'जादू की झप्पी'; RJ च्या या मुलाखतीमुळे संतापले युजर्स

प्रसिद्ध आरजे मलिष्कानेही गोल्डन बॉयची मुलाखत घेतली. दरम्यान ही मुलाखत ऑनलाइन होती. मलिष्कासह तिची टीम देखील उपस्थित होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 21 ऑगस्ट : काही दिवसांपूर्वीच टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धा पार पडल्या आहेत. भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत देशाचं नाव मोठं केलं. रौप्य आणि कांस्य पदकांसह एक सुवर्ण पदक (Gold Medal) देखील देशाच्या पारड्यात पडलं. पानिपतचा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकला. सध्या संपूर्ण देशभरात नीरजच कौतुक होत आहे. याशिवाय सगळीकडे त्याच्या मुलाखती देखील सुरू आहेत. काही ठिकाणी तो प्रत्यक्ष मुलाखती देत आहे. तर काही ठिकाणी ऑनलाइन. प्रसिद्ध आरजे मलिष्कानेही गोल्डन बॉयची मुलाखत घेतली. दरम्यान ही मुलाखत ऑनलाइन होती. मलिष्कासह तिची टीम देखील उपस्थित होती. यावेळी नीरजची मुलाखत घेताना मलिष्का आणि तिची संपूर्ण मुलींची टीम स्वतःला डान्स करण्यापासूनही आवरू शकली नाही. त्यांनी ‘उडे जबजब जुलफे तेरी’ या गण्यावर नीरजला उद्देशून डान्स केला.

यानंतर मलिष्काने त्याच्याशी संवादही साधला. यावेळी मलिष्काने अगदी हटके चर्चा केली. ती म्हणाली, ‘मला तुला एक जादूची झप्पी द्यायची आहे आणि त्यानंतर ती चक्क लॅपटॉपला मीठी मारते.’ यावर नीरजने उत्तर देत म्हटलं की, ‘नमस्ते…असच लांबून नमस्ते,’ व तो हसू लागतो. मलिष्का आणि नीरजची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर नेकरी मलिष्काच्या या वागण्यावर संतापलेले दिसत आहेत.

संबंधित बातम्या

अनेकंनी मलिष्का आणि तिच्या टीमला ट्रोल केलं आहे. काही युझर्सनी तर याला लैंगिग जाच म्हटलं आहे. तर अनेकांनी ‘आमच्या सुवर्ण पदक विजेत्याला कोणत्या मुर्खपणातून जावं लागतं.’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी या ठिकाणी मुलगी असती आणि मुलाने असा प्रकार केला असता तर भयंकर घडलं असतं असही म्हटंल आहे. त्यामुळे मलिष्का फारच ट्रोल होताना दिसत आहे.

जाहिरात

मलिष्काच्या या मुलाखतीनंतर सोशल मीडियावर अनेतक प्रतिक्रियाही व्हायरल होत आहेत.

जाहिरात

युझर्सनी तिची चांगलीच शाळा घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या