JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सर्जरीऐवजी निवडला असा मार्ग; रेमो डिसूजाच्या पत्नीने घटवलं 2 वर्षांत 40 किलो वजन

सर्जरीऐवजी निवडला असा मार्ग; रेमो डिसूजाच्या पत्नीने घटवलं 2 वर्षांत 40 किलो वजन

कोरिओग्राफर रेमो डिसूझाने आपल्या सोशल मीडियावर या तरुणीसोबतचा फोटो शेअर करत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडमधला प्रसिद्ध कोरिओग्राफर (Choreographer) रेमो डिसूझा (Remo D’souza) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. त्याच्या डान्सचे तसेच त्याची पत्नी (Remo D’souza’s wife) लिझेलसोबत (Lizelle D’souza) व्हिडिओ तो शेअर करत असतो. अलीकडेच रेमोने आपल्या पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे सर्वांनच धक्का बसला आहे. रेमोच्या पत्नी फॅटची फिट झाली आहे. तिच्यामध्ये सॉलिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन दिसून येत आहे (Remo D’souza’s wife body transformation). रेमोने स्वतःचा आणि लिझेलचा जुना आणि सध्याचा असे दोन फोटो शेअर केले आहेत.  या फोटोमध्ये लिझेल खूपच सुंदर दिसत आहे. वजन कमी केल्यानंतर तिच्यात झालेला फरक विलक्षण आहे. रेमोने लिझेलचे खूप कौतुक केले आहे.  तिचं हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन (body Transformation) बघून चाहते थक्क झाले आहेत.

संबंधित बातम्या

नवभारत टाइम्स च्या वृत्तानुसार वाढत्या वजनामुळे त्रस्त असलेल्या लिझेलनं 2018 मध्ये बेरियाट्रिक सर्जरी (Bariatric Surgery) करून घेण्याचा निर्णय घेतला होता; पण नंतर तिनं आपला विचार बदलला आणि गॅस्ट्रिक बलून शस्त्रक्रियेचा (Gastric Balloon Surgery) निर्णय घेतला, मात्र डॉक्टरांनी त्या शस्त्रक्रियेनंतरही वजन पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितल्यानं लिझेलने तोही विचार बदलला. तिने वजन कमी करून स्वत:त बदल करण्याचा निर्णय घेतला आणि जानेवारी 2019 पासून तिच्या वजन कमी करण्याच्या लढाईला सुरुवात झाली. हे वाचा -  ‘तारक मेहता’मधील सोज्वळ माधवी भाभीचा हा Bold Look पाहिलात का? यासाठी फिटनेस ट्रेनर प्रशांत (Trainer Prashant) याच्या मदतीनं तिनं इंटरमिटंट फास्टिंगला (Intermittent Fasting) सुरुवात केली. त्याच दरम्यान ती ‘स्ट्रीट डान्सर’ (Street Dancer) चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला (London) गेली होती. त्या काळात तिनं कार्बोहायड्रेट्स (Carbs) घेणे पूर्णपणे बंद केले. 15 तासांचे फास्टिंग ती करत असे. या चित्रपटातील अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिच्यासोबत तिच्या फिटनेसची काळजी घेण्याकरता प्रशांतची पत्नी सोबत आली होती. ती लिझेलच्या खाण्यापिण्याचीही काळजी घेत असे. त्या पहिल्या वर्षी लिझेलनं 15 ते 20 किलो वजन कमी करण्यात यश मिळवलं. त्यानंतर जून 2020 मध्ये तिनं वेट ट्रेनिंग आणि आहारावर लक्ष केंद्रित केलं. त्यामुळं तिचं वजन खूप कमी झाले होते. हे वाचा -  VIDEO:रोहित शेट्टीने माधुरीला उंदीर पकडायला सांगितलं;धकधक गर्लची झाली अशी अवस्था घरी जिम असल्यानं ती लॉकडाउनच्या (Lockdown) काळातही व्यायाम करत होती. याशिवाय 18-20 तासांचे इंटरमिटेंट फास्टिंग सुरू केले. ती आणि रेमो दोघेही संध्याकाळी इमारतीच्या कंपाउंडमध्ये दररोज भरपूर चालत असत. या काळात लिझेल दिवसातून फक्त एकदाच जेवत असे. ती किटो डाएटही (Kito Diet) करत असे, तिला ते चांगलं मानवले होते. तिच्या मते किटो डाएट सर्वोत्तम आहे. मात्र याच काळात रेमो आजारी पडल्यानं लिझेलनं किटो डाएट सोडून दिलं. त्याकाळात तिनं लिक्विड डाएट करण्याचा प्रयत्न केला; पण मध्येच एका प्रकारचे डाएट सोडल्यानं तिचं वजन पुन्हा 6 किलोनं वाढलं. मात्र कठोर परीश्रम घेऊन तिनं पुन्हा वाढलेलं वजन कमी केलं. लिझेलने अवघ्या 2 वर्षांत 40 किलो वजन कमी केले असून, तिनं 105 किलोवरून 65 किलोपर्यंत वजन कमी करण्यात यश मिळवलं आहे. आता डिसेंबरपर्यंत आणखी दहा किलो वजन कमी करण्याचं तिचं ध्येय आहे. यासाठी तिनं घेतलेल्या मेहनतीचे रेमोने खूप कौतुक केलं आहे. तर रेमो आणि मुलांनी पाठिंबा दिल्यानं हे कठीण काम शक्य झाल्याचं लिझेलनं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या