मुंबई 1 जुलै**:** प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी हिच्या पतीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. 30 जून रोजी राज कौशल यानं अखेरचा श्वास घेतला. राजच्या निधनामुळं मंदिरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला असून गेले दोन दिवस ती कोणाशीही एक शब्द देखील बोललेली नाही. लक्षवेधी बाब म्हणजे असाच काहीसा धक्कादायक अनुभव यापुर्वी रेखा आणि लीना चंदावरकर यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी घेतला आहे. रेखा – एकेकाळी रेखा या बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. 1991 साली त्यांनी मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं होतं. ते एक नामांकित व्यवसायिक होते. लग्नानंतर काहीच वर्षात दोघांमध्ये मतभेद झाले अन् त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. रेखापासून वेगळे होताच काही महिन्यांनी त्यांनी आत्महत्या केली. त्यावेळी ते केवळ 35 वर्षांचे होते. त्याकाळी मुकेश अग्रवाल यांच्या आत्महत्येच खापर रेखा यांच्या माथी फोडण्यात आलं होतं. त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती. ‘16 कोटी जमा करायला मदत करा’; रिया चक्रवर्तीची वाढदिवशी चाहत्यांना खास विनंती विजयता पंडित – अभिनेत्री विजयता यांनी प्रसिद्ध पॉप सिंगर आदेश श्रीवास्तव यांच्याशी लग्न केलं होतं. 2015 साली कर्करोगामुळं त्यांचं निधन झालं. अनिवेश आणि अनितेष अशी त्यांना दोन मुलं आहेत. लीना चंदावरकर - वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री लीना चंदावरकर यांनी 1975 मध्ये सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी लग्न केलं. लग्नाच्या काही महिन्यांनंतर सिद्धार्थची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांनी किशोर कुमार यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. मात्र लग्नानंतर सातच वर्षांनी त्यांचं देखील निधन झालं. त्यावेळी लीना अवघ्या 37 वर्षांच्या होत्या. ‘म्हातारं होणं हा गुन्हा आहे का?’ वय झाल्यानंतर बॉलिवूड दखल घेत नाही; शरत सक्सेना यांची खंत शांतिप्रिया – अक्षय कुमारच्या सौगंध या चित्रपटातून आपलं फिल्मी करिअर सुरु करणाऱ्या शांतिप्रिया हिनं 1999 साली सिद्धार्थ रेसोबत लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर काहीच वर्षात तिच्या पतीचं निधन झालं. त्यावेळी ती केवळ त्यावेळी ती केवळ 35 वर्षांची होती. केकेशन – अभिनेत्री केकेशन यांनी आरिफ पटेल यांच्यासोबत लग्न केलं होतं. 2019 मध्ये हृदय विराराच्या झटक्यामुळं तिच्या पतीचं निधन झालं.