मुंबई, 5 ऑगस्ट : ‘बिग बॉस’ च्या माध्यमातून अनेक जोड्या एकत्र येतात. काहींचं प्रेम बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर देखील टिकून राहतं. तर काही नाती अल्पकाळच टिकतात. बिग बॉस ओटीटी दरम्यान अशीच एका जोडीची प्रचंड चर्चा झाली ती म्हणजे राकेश बापट आणि शमिता शेट्टी. बिग बॉस ओटीटी शो सिझन 15 मध्ये दोघे एकत्र होते. या दरम्यानच त्यांच्या प्रेमाला भर आला. या शो मधून बाहेर पडल्यावरही दोघांना अनेक ठिकाणी एकत्र पाहिलं गेलं. सोशल मीडियावरसुद्धा या दोघांनी एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर दोघे लवकरच लग्न करतील अशा चर्चा देखील होऊ लागल्या. मात्र काही दिवसांपूर्वी दोघांनीही ‘आता आम्ही एकमेकांसोबत नाही’ असं जाहीर केलं. या दोघांचं ब्रेकअप झालं आहे. पण ब्रेकअप झाल्यानंतर या दोघांचा एक व्हिडीओ प्रचंड हिट होत आहे. खरंतर राकेश आणि शमिताची जोडी चाहत्यांना खूपच आवडली होती. चाहत्यांनी या दोघांना भरभरून प्रेमही दिलं आहे. सोशल मीडियावर या दोघांचे फोटोज आणि व्हिडीओज प्रचंड व्हायरल झाले होते. परंतु आता या दोघांना वेगळं होण्याचा मार्ग निवडला आहे. शमिताने तिच्या इंस्टाग्रामवरून स्टोरी शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली. पण त्या दोघांचा एक म्युझिक व्हिडीओ आज प्रदर्शित झाला आहे.
राकेश आणि शमिता यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. व्हिडीओमध्ये शमिता आणि राकेशचा रोमाँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. हेही वाचा - Kajol Birthday : ‘बाजीगर’ची प्रिया ते ‘त्रिभंगा’ची अनुराधा; असा आहे काजोलचा फिल्मी प्रवास राकेश आणि शमिताच्या या म्यूझीक व्हिडीओचं नाव ‘तेरे विच रब दिसदा’ असं आहे. राकेश आणि शमिताच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच आहे. या व्हिडिओमधून या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्याची संधी मिळतेय. त्यामुळे या दोघांचे चाहते सध्या खुश आहेत. शमिताने ब्रेकअप बद्दलच्या पोस्टमध्येच या म्युझिक व्हिडिओचा उल्लेख केला होता. तिनं चाहत्यांना या पोस्टमधून एक विनंती केली होती. ती म्हणाली होती कि, ’ म्युझिक व्हिडीओ आम्ही खूप प्रेमाने आमच्या चाहत्यांसाठी बनवला आहे. या चाहत्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं आहे. आम्ही आता वेगळं होत असलो तरी एक स्वतंत्र व्यक्ती चाहत्यांनी आमच्यावर प्रेम करावं’ तसेच हा म्युझिक व्हिडीओ आमच्या सर्व चाहत्यांना समर्पित करते.’ असं भावनिक आवाहन तिने चाहत्यांना केलं होतं.