रणबीर कपूरचा द रोअर ऑफ 'अॅनिमल' वादात सापडला आहे
मुंबई, 12 जून : बॉलिवूड़ अभिनेता रणबीर कपूरच्या द रोअर ऑफ ‘ अॅनिमल ’ या चित्रपटाचा एक रोमांचक प्री-टीझर रिलीज झाला आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि लेखक-दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचा हा सिनेमा आहे. या सिनेमात रणबीरचा ऍक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणामुळे हा चित्रपट चर्चेत होते. या चित्रपटाच्या या प्री-टीझरला प्रेक्षक दणदणित प्रतिसाद देत आहेत. पण आता हा चित्रपट रिलीज आधीच वादात सापडला आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आला आहे. रणवीरच्या चित्रपटावर कॉपी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोरियन चित्रपट ओल्डबॉयमधील सीन्स कॉपी केल्याचा आरोप ‘अॅनिमल’वर करण्यात आल्याचे बोलले जात आहे. ‘अॅनिमल’ हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाला दोन महिने उरले असताना आता नवा वाद सुरु झाला आहे.
‘अॅनिमल’च्या प्री-टीझर व्हिडिओमध्ये रणबीर कपूर अॅक्शन अवतारात दिसत आहे. ज्यामध्ये तो कॉरिडॉरमध्ये कुऱ्हाडीच्या सहाय्याने शत्रूंशी लढताना दिसत आहे. हे पाहिल्यानंतर काही सोशल मीडिया युजर्सनी चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्यावर दक्षिण कोरियाच्या ‘ओल्डबॉय’ चित्रपटातील सीन्स कॉपी केल्याचा आरोप केला आहे. एक दोन नाही तर 6 अभिनेत्रींसोबत होतं अफेअर; तरी शेवटी आयुष्यभर एकटाच राहिला अभिनेता अनेक युजर्सचे म्हणणे आहे की अॅनिमल फिल्मचा हा सीन कोरियन फिल्म ओल्डबॉयची कॉपी आहे. हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट चांगलाच आवडला होता. अनेकांनी ट्विटरवर या दोन्ही दृश्यांमधील साम्य निदर्शनास आणून दिले आहे. ‘तुम्ही यापेक्षा चांगले काम करू शकला असता, पण तुम्ही त्याची कॉपी केली.’ असं म्हणत नेटकऱ्यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला फटकारलं आहे.
‘कबीर सिंग’ फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ मध्ये रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल देखील दिसणार आहेत. प्रत्येकजण या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. रश्मिका मंदान्ना आणि रणबीर पहिल्यांदाच या चित्रपटातून एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे. भूषण कुमार निर्मित, या क्लासिक गाथेमध्ये भारतीय चित्रपट उद्योगातील दोन डायनॅमिक पॉवरहाऊस आहेत - दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा आणि अभिनेता रणबीर कपूर! हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम या 5 भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.