JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'आमच्या नात्यात कोणीतरी विष कालवल'; उद्धव ठाकरेंबद्दल राज यांनी पहिल्यांदाच मन केलं मोकळ

'आमच्या नात्यात कोणीतरी विष कालवल'; उद्धव ठाकरेंबद्दल राज यांनी पहिल्यांदाच मन केलं मोकळ

खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमाच्या पहिल्या भागात कोण पाहुणे असणार याची झलक दाखवण्यात आली होती. पाठमोरे उभे असलेले राज ठाकरे यात दिसत होते. तेव्हापासूनच प्रेक्षक खुपते तिथे गुप्तेच्या पहिल्या एपिसोडची आतुरतेने वाट पाहत होते.

जाहिरात

राज ठाकरे खुपते तिथे गुप्तेच्या पहिल्या एपिसोडमध्ये

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 मे :  जून महिन्यापासून प्रत्येक रविवार प्रेक्षकांसाठी स्पेशल ठरणार आहे.  कारण ‘आता खुपणार नाही टोचणार’ असं म्हणत झी मराठीवर लोकप्रिय कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खुपते तिथे गुप्तेच्या पहिल्या एपिसोडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वर्णी लागणार आहे. अवधुतचे खुपणारे प्रश्न आणि राज ठाकरेंची बेधडक उत्तर यावेळी पाहायला मिळणार आहेत. पण नेहमीच बेधडक बोलणाऱ्या राज ठाकरेंची हळवी बाजू देखील या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं बालपण एकत्र गेलं. राजकारणाचे धडे देखील त्यांनी एकत्र घेतले मात्र प्रत्यक्षात राजकारणाच्या पटावर उतरल्यानंतर दोघांनी वेगवेगळे मार्ग निवडले. पण राजकारणाव्यतिरिक्त दोन्ही भावांचे सलोख्याचे संबंध वेळोवेळी पाहायला मिळाले आहेत. अडीअडचणीत, सण समारंभाना दोघे भाऊ गुण्या गोविंदानं एकत्र आलेले अनेकदा पाहायला मिळालंय.  त्यांची हीच बाजू उलगड्याचा प्रयत्न अवधूत गुप्ते त्यांच्या कार्यक्रमात करताना पाहायला मिळणार आहे. खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाची गेली अनेक दिवसांपासून चर्चा आहे. कार्यक्रमाचा पहिला प्रोमो काही दिवसांआधी प्रदर्शित झाला होता. ज्यात कार्यक्रमाच्या पहिल्या भागात कोण पाहुणे असणार याची झलक दाखवण्यात आली होती. पाठमोरे उभे असलेले राज ठाकरे यात दिसत होते. तेव्हापासूनच प्रेक्षक खुपते तिथे गुप्तेच्या पहिल्या एपिसोडची आतुरतेने वाट पाहत होते. हेही वाचा -  प्राजक्ता गायकवाडने सोडलं ‘शिवपुत्र संभाजी’ नाटक; आता ‘ही’ अभिनेत्री साकारणार येसूबाई

संबंधित बातम्या

कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात राज ठाकरे अवधुतच्या स्पेशल खुर्चीत बसलेत. समोर स्क्रिनवर राज ठाकरे आणि उद्धव यांच्या जुन्या फोटोंची एक चित्रफित सुरू आहे.  दोघांच्या जुन्या आठवणी पाहून राज ठाकरे भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय. चित्रफित संपल्यानंतर अवधुत राज ठाकरेंना विचारतोय, ‘काय वाटतं सगळं असं एकत्र पाहून?’ त्यावर राज ठाकरे भावुक झालेले पाहायला मिळत आहेत. ते उत्तर देत म्हणतात, ‘खूप छान दिवस होते ते.  माहिती नाही मला कोणीतरी विष कालवलं किंवा नजर लागली’.  राज ठाकरेंच्या या उत्तरावर अवधूत त्यांना ‘हे दिवस परत येऊ नाही शकणार?’, असं विचारतो, त्यावर राज ठाकरे काहीच बोलत नाहीत. त्यांचा भावुक झालेला चेहरा या ठिकाणी पाहायला मिळतोय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या