मुंबई 5 जून : एकेकाळी बॉलिवूडवर (Bollywood) राज्य करणारे अभिनेते, निर्माते राज कपूर (Raj Kapoor) यांच्याविषयीचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. त्यातीलच एक म्हणजे राज कपूर आणि त्यांची पत्नी कृष्णा मल्होत्रा (Krishna Malhotra) यांची प्रेमकहानी. पाहायला गेलं तर राज कपूरं यांच अरेंज मॅरेज झालं होतं. बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते असूनही त्यांनी अरेंज मॅरेज केलं होतं. त्याकाळी राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर (Pruthviraj Kapoor) हे नाटक कंपनी चालवायचे. त्यांचे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी नाटकाचे प्रयोग चालायचे. अशाच एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान पृथ्वीराज कपूर यांची नाटक कपंनी मध्यप्रदेशातील रिवा इथे पोहोचली होती. त्यावेळी एका ठिकाणी अनेक दिवस काढले जाई. तेव्हा तेथील त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था पोलिस ऑफिसर करतार नाथ मल्होत्रा हे करत होते. या गाण्यामुळं नेहा कक्करला मिळालं होतं Indian Idolचं तिकिट; पाहा 14 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ
47 वर्षांच्या मलायकाचा हॉट आणि बोल्ड अंदाज, तरुणाईला दिले फिटनेस गोल्स नाटक कंपनी बराच काळ रिवामध्ये होती. त्यामुळे करतार नाथ मल्होत्रा आणि पृथ्वीराज यांच्यात चांगली मैत्री निर्माण झाली. तेव्हा पृथ्वीराज यांनी या मैत्रीचं नात्यात रुपांतर करण्याचं ठरवलं. व करतार यांच्या मुलीला म्हणजेच कृष्णाला राज कपूर यांच्याशी विवाह करण्यासाठी मागणी घातली. त्यावेळी राज हे केवळ 22 वर्षांचे होते.
1946 मध्ये त्यांचा विवाह झाला. करतार नाथ यांच्या शासकीय निवासस्थानी हा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यानंतर कृष्णा यांनी कपूर खानदानात स्वतःला वाहून घेतलं. त्यांना 5 मुलं झाली.त्यातील 3 मुलं व 2 मुली. ऋषी, रणधीर, राजीव, रिमा आणि ऋतू. राज कपूर हे चित्रपटसृष्टीत असल्याने अनेक अभिनेत्रींशी त्यांची नावं जोडली जायची. पण याचा परिणाम कधीच राज आणि कृष्णा यांच्या संसारावर झाला नाही. कृष्णा यांनी अगदी उत्कृष्टरित्या कुटुंब साभाळलं.