JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Priyanka Chopra: अखेर प्रियांका चोप्रा 'या' दिवशी दाखवणार लेक मालतीचा चेहरा; आई मधुने केला खुलासा

Priyanka Chopra: अखेर प्रियांका चोप्रा 'या' दिवशी दाखवणार लेक मालतीचा चेहरा; आई मधुने केला खुलासा

अखेर प्रियांकानं आपली लेक मालती मारीचा चेहरा सर्वांना दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियांकाची आई मधुने नातीचा चेहरा दाखवण्याबाबत खुलासा केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,  3 ऑगस्ट: बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडून ग्लोबल स्टार झालेली सर्वांची लाडकी देसी गर्ल प्रियांका चोप्रा. प्रियांका सध्या तिचं आईपण अनुभवते आहे. प्रियांका आणि तिचा नवरा निक जोनस सध्या आई वडील झाल्याचं सुख अनुभवत आहेत. लेक मालतीच्या जन्मानंतर दोघांचं आयुष्य बदललं आहे. प्रियांकानं अनेकदा लेक मालती मारी बरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. मात्र तिचा चेहरा काही आजवर दाखवलेला नाही. त्यामुळे देसी गर्लची लेक नक्की दिसते तरी कशी हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. अखेर प्रियांकानं आपली लेक मालती मारीचा चेहरा सर्वांना दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियांकाची आई मधुने नातीचा चेहरा दाखवण्याबाबत खुलासा केला आहे. प्रियांका आणि निक जोनस जानेवारी महिन्यात सरोगसीद्वारे आई वडील झाले. जोनस कुटुंबात मालती या चिमुकलीचा जन्म झाला. मदर्स डेचं औचित्य साधून प्रियांकानं लेकीची पहिली झलक तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली. तेव्हा तिनं लेकीबाबत एक महत्त्वाचा खुलासा देखील केला.  मालतीचा जन्म झाल्यानंतर 100 दिवस ती आयसीयूमध्ये होती. तिच्यावर उपचार सुरू होते. अखेर 100दिवसांनी मालतीला घरी आणलं. नुकतीच प्रियांकाची आई मधु यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. तेव्हा प्रियांका आणि निक जोनसचं त्यांच्या लेकीचा चेहरा काही दिवसात सर्वांना दाखवणार आहेत, असं सांगितलं.

हेही वाचा - Adinath Kothare: बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीच्या सिरीजमध्ये झळकणार दौलतराव मालतीच्या जन्मानंतर सगळेच खुश आहेत. प्रियांकानं लेकीचं नाव आईच्या नावावरुन ठेवलं आहे. तिच्या आईचं नाव मधुमालती असं आहे. त्यावरुन तिनं लेकीचं नाव मालती असं ठेवलं. मधु  प्रियांका आणि निक यांच्या पालकत्वाबाबत बोलताना म्हणाल्या, मी मालतीची मालिश करते. निक तिला आंघोळ घालतो. तिचे डायपर चेंज करतो. दोघेही त्यांच्या लेकीचा चेहरा तिच्या पहिल्या वाढदिवसाला दाखवू शकतात असा खुलासा त्यांनी केला. प्रियांकाने सगळ्यांना सांगितलं आहे की, पहिली काही वर्ष ती तिच्या मुलीला कोणताही स्क्रिन टाइम देणार नाही. लहानपणापासून तिचा स्क्रिन टाइम वाढला तर पुढे तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागेल असं ती म्हणाली . प्रियांकानं नुकताच तिचा 40 वा वाढदिवस लेक मालतीबरोबर साजरा केला.  निक जोनसचा मित्र परिवार आणि कुटुंबाबरोबर प्रियांकानं तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. सोशल मीडियावर तिनं पार्टीचे फोटो देखील शेअर केले होते. आता प्रियांकाच्या लेकीचा चेहरा पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांना  2023 ची वाट पाहावी लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या