JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रियांका चोप्रानं 20 वर्षात जमवली इतकी संपत्ती; आकडा बघून तुम्हालाही बसेल शॉक

प्रियांका चोप्रानं 20 वर्षात जमवली इतकी संपत्ती; आकडा बघून तुम्हालाही बसेल शॉक

प्रियांका चोप्राची एकूण संपत्ती पाहून तुमचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

जाहिरात

जुलै महिन्यात जन्माला आलेले लोक भांडण-तंटा करत नाहीत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 18 जुलै**:** प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. जवळपास दोन दशकं आपल्या दर्जेदार अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रियांकानं हॉलिवूड सिनेसृष्टीतही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रियांका सध्या यशाच्या शिखरावर आहे. (social media post) अन् त्यामुळेच तिच्या कमाईचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. (Priyanka Chopra net worth 2021) तिची एकूण संपत्ती पाहून तुमचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. शिवा काशिद साकारणं किती कठीण होतं? विशालनं सांगितला ‘जय भवानी जय शिवाजी’चा अनुभव Caknowledgeclub ने जाहिर केलेल्या एका रिपोर्टनुसार प्रियांकाचा 2021 मधील नेटवर्थ 30 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जवळपास 225 कोटी रुपये इतका आहे. शिवाय तिचा पती निक जोनस देखील चांगलीच कमाई करतो. त्यामुळे त्याची कमाई जर यामध्ये जोडली तर दोघं मिळून कमीतकमी 734 कोटी रुपये वर्षाला कमावतात. तसंच प्रियांकाकडे कोट्यवधींच्या गाड्या आणि भारतात अनेक ठिकाणी मोठमोठे बंगले आहे. ही अतिरिक्त गुंतवणूक 100 कोटींच्या आसपास आहे. अन् गेल्या काही काळात सोशल मीडियावर देखील तिचा भाव वधारला आहे. मीठ- भाकरी खाऊन काढले होते दिवस; वाचा खळखळून हसवणाऱ्या भारती सिंगची अश्रु आणणारी संघर्षगाथा अलिकडेच हॉपरएचक्यू या वेबसाईटनं सोशल मीडियावरील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहिर केली होती. या सेलिब्रिटींना इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यासाठी किती रुपयांचं मानधन दिलं जातं याचं संशोधन त्यांनी केलं. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा 27 व्या स्थानावर आहे. वेब साईटनं केलेल्या दाव्यानुसार तिला एका पोस्टसाठी कमीतकमी 3 कोटी रुपयांचं मानधन दिलं जातं. या पार्श्वभूमीवर विचार करता प्रियांका वर्षाला कमीतकमी 1 हजार कोटी रुपयांची कमाई करते. इतकी जास्त कमाई करणारी ती भारतातील पहिलीच अभिनेत्री आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या