लेकीसाठी काय पण! 4 महिन्यांच्या मुलीसाठी पप्पा निक जोनस गातो क्लासिकल गाणी
मुंबई, 27 मे: बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्ये नाव कमावणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) काही महिन्यांपूर्वीच आई झाली. निक आणि प्रियांका यांनी मुलीचं नाव ‘मालती’ (malti Marie) असं ठेवलं आहे. दोघेही सध्या मुलीची काळजी घेण्यात व्यस्त आहे. प्रियांका आणि निक मुलगी झाल्यापासून फार खुश आहेत. मालती आता फक्त 4 महिन्यांची आहे. तब्बल शंभर दिवसांनी ती आयसीयूमधून घरी आली आहे. मुलीला खुश आणि आनंदी ठेवण्यासाठी निक प्रियांका सतत प्रयत्न करत असतात. विश्वास बसणार नाही पप्पा निक जोनस मुलगी मालतीसाठी क्लासिकल गाणी गातो. नुकत्याच एका मुलाखतीत निकने हा खुलासा केला आहे. पॉप सिंगर निक जोनसने एंटरटेनमेंट टूनाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, ‘मला मालतीसाठी गाणं गायला फार आवडतं. तिच्यासाठी गाणे गाणं फार माझ्यासाठी माझ्यासाठी खास क्षण असतो. प्रियांकालाही माझ क्लासिकल गाणं ऐकायला आवडतं’. हेही वाचा - प्रदर्शनाला काही दिवस शिल्लक असताना ‘पृथ्वीराज’ सिनेमाचं नाव बदललं; काय आहे कारण? निक पुढे म्हणाला, ‘मालतीसाठी प्रियांका तिच्या छोट्या आयपॅडवर अनेक गाणी लावून तिला खेळवत असते पण मला मालतीसाठी प्रत्यक्ष गाणं फार आवडतं. तिला काही कळत नाही पण ती गाणं एंजॉय करते’.
निक जोनस सध्या लास वेगासमध्ये आपला ब्रँड ‘द जोनस ब्रदर्स’सोबत आपल्या म्युझिकवर काम करत आहे. त्याच्याबरोबर त्याचा मोठा भाऊ केविन देखील आहे. ‘जोनस ब्रदर्स लिव्ह इन वेगास’ विषयी सांगताना निक म्हणाला, ‘मी फार उत्साही आहे. हा शो फार फार आधी प्रेक्षकांसमोर येणार होता परंतु काही कारणास्तव शो पुढे ढकलण्यात आला’. निक आणि प्रियांका जानेवारी महिन्यात आई वडिल बनले. सरोगसीच्या माध्यमातून त्यांना मुलगी झाली . परंतू मुलीला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. शंभर दिवसांनी मुलगी घरी आल्यानंतर प्रियांकाने मुलगी मालतीबरोबर तिचा पहिला मदर्स डे साजरा केला. दोघांनी मुलीसोबतचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला होता. परंतू निक आणि प्रियांका यांनी मुलीचा फोटो रिव्हील न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निक प्रियांकाच्या मुलीला पाहण्यासाठी चाहते फार आतूर आहेत.