JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Psycho Saiyaan च्या प्रेमात पडली श्रद्धा कपूर, ही भानगड आहे तरी काय?

Psycho Saiyaan च्या प्रेमात पडली श्रद्धा कपूर, ही भानगड आहे तरी काय?

श्रद्धा कपूरने खास त्याच्यासाठी सिल्वर रंगाचा शॉर्ट ग्लिटरी ड्रेस घातला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 जुलै- प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या आगामी साहो सिनेमातील सायको सैंया हे पहिलं गाणं नुकतच प्रदर्शित झालं. ध्वनी भानुशालीने हे गाणं गायलं असून श्रीजोने गाण्याचे बोल लिहिले आहेत. 2 मिनिटं आणि 11 सेकंदांच्या या गाण्याला तनिषअक बागचीने संगीत दिलं आहे. गाण्यातली प्रभास आणि श्रद्धाची केमिस्ट्री लोकांना फार आवडत आहे. प्रभास नेहमीप्रमाणे त्याच्या कॅज्युअल लुकमध्ये दिसत आहे तर श्रद्धाने सिल्वर रंगाचा शॉर्ट ग्लिटरी ड्रेस घातला आहे. बहुप्रतिक्षीत साहो सिनेमात सुपरस्टार प्रभास अफलातून अक्शन सीन करताना दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर या सिनेमातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. साहो सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला होता. प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची प्रमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाच्या 1 मिनिटं आणि 39 सेकंदाच्या टीझरमध्ये प्रभास अ‍ॅक्शन अवतारात दिसत असून श्रद्धा कपूरसोबत संवाद वगळता यामध्ये संपूर्ण टीझरमध्ये प्रभास सिनेमातील खलनायकांशी दोन हात करताना दिसत आहे. चंकी पांडे, नील नितीन मुकेश आणि जॅकी श्रॉफ असे तीन खलनायक या टीझरमध्ये पाहायला मिळतात. याशिवाय अ‍ॅक्शन सोबतच या टीझरमध्ये थ्रीलर, रोमान्स आणि इमोशन्स यांचं मिश्रण पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर सुद्धा या सिनेमामध्ये स्टंट सीन करताना दिसणार आहे. साहो सिनेमात प्रभास आणि श्रद्धा कपूरशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, चंकी पांडे, अरुण विजय आणि मुरली शर्मा यांसारखे तगडे कलाकार असणार आहेत. साहो हा एक अक्शन थ्रिलर सिनेमा असून येत्या 15 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सुजीतने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून वामसी, प्रमोद आमि विक्रम यांनी साहो सिनेमाची निर्मिती केली आहे. येत्या १५ ऑगस्टला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे. बाहुबलीनंतर प्रभासचा हा दुसरा सिनेमा असणार आहे. यासोबतच पहिल्यांदा प्रभास आणि श्रद्धाची हिट जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘तब तक यही जंग जारी रहेगी.. ये बाजी कभी ना तुम्हारी रहेगी’ ‘माझ्याविरुद्ध लिहितोस..’ भर पत्रकार परिषदेत रिपोर्टरवर भडकली कंगना रणौत जेव्हा निकच प्रियांकाचं असं फोटोशूट करतो मलायका-अर्जुनमध्ये आता प्रेमाचा त्रिकोण, दोघांत आली तिसरी व्यक्ती VIDEO : भाजपात दाखल झाल्यानंतर सपना चौधरी म्हणते…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या