मुंबई 1 जुलै: विरासत या चित्रपटातून नवावारुपास आलेली पूजा बत्रा (Pooja Batra) ही बॉलिवूडमधील अत्यंत ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. वयाच्या चाळीशीनंतरही एखाद्या विशीतील तरुणीला लाजवेल असं फिटनेट तिच्याकडे आहे. त्यामुळं चाहते तिच्या सौंदर्याची स्तुती करु मात्र थकत नाहीत. परंतु तुम्हाला पाहून आश्चर्य वाटेल अगदी पूजा सारखी हुबेहुब दिसणारी एक हॉलिवूड अभिनेत्री देखील आहे. या अभिनेत्रीचं नाव डेब्रा मेसिंग (Debra Messing) असं आहे. तिचं वय देखील चाळीशी उलटून गेलेलं आहे. मात्र सौंदर्याच्या बाबतीत ती देखील अनेक नामांकित अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. गुलशन कुमार का विकेट गिरनेवाला है! आधीच मिळाली होती हत्येची टीप आश्चर्याची बाब म्हणजे पूजा आणि डेब्राचे फोट समोरासमोर ठेवून तुम्ही निरिक्षण केलं तर त्यांचे चेहरे अगदी हुबेहुब दिसतात. यातील कोण डेब्रा आणि कोण पूजा हे देखील तुम्हाला ओळखता येणार नाही. या दोघांचे क्लब केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. Me Too: ‘दिग्दर्शकाला मांड्या आणि क्लिवेज पाहायचं होतं’;आश्रम फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा ड्रेब्रा मी हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अ वॉक इन द क्लाऊड या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तिनं आतापर्यंत 50 पेक्षा अधिक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे पूजा आणि डेब्रा या दोघांचीही सुरुवात मॉडलिंग क्षेत्राततून झाली होती. अन् पुढे दोघांनीही आपल्या मादक अदांद्वारे एक वेगळा प्रक्षकवर्ग निर्माण केला.