JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रिल लाईफमध्ये अफूचा व्यवसाय करणारे कालिन भैया झाले NCB चे अँबेसिडर

रिल लाईफमध्ये अफूचा व्यवसाय करणारे कालिन भैया झाले NCB चे अँबेसिडर

या नव्या प्रोजेक्टबाबत पंकजनं देखील आनंद व्यक्त केला आहे. तो ही नवी भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 27 जून**:** मिर्झापुर या सुपरहिट वेब सीरिजमधून नावारुपास आलेला पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आज बॉलिवूडमधील आघाडिचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या याच लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा निर्णय NCB नं घेतला आहे. त्याला नारकॉटिक्स कंट्रोल ब्यूरोचा ब्रँड अँबेसिडर करण्यात आलं आहे. आता तो अंमली पदार्थांबाबत जनजागृती करणार आहे. शिवाय देशातील तरुण पिढीला व्यसनमुक्त करण्यासाठी NCBला मदत करणार आहे. बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना नोकरांच्या भूमिका का देतात? अशोक सराफांनी सांगितलं सत्य मिळालेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी पटनामधील NCB विभागानं या नव्या प्रकल्पाबाबत पंकज त्रिपाठीशी चर्चा केली होती. अन् त्यानं देखील यावर लगेचच होकार दर्शवला होता. परंतु हा प्रकल्प कशा प्रकारे आमलात आणायचा याबाबत कुठलीही रुपरेषा ठरवण्यात आली नव्हती. अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर आता या नव्या प्रकल्पाची रुपरेषा ठरवण्यात आली आहे. पंकजची इमेज क्लिन आहे. सोबतच तो लोकप्रिय आहे. आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही. त्यामुळं अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यासाठी NCBनं पंकजचीच निवड केली. चाहत्यांची अनोखी जिद्द; राम चरणला शुभेच्छा देण्यासाठी 231KM केला पायी प्रवास या नव्या प्रोजेक्टबाबत पंकजनं देखील आनंद व्यक्त केला आहे. तो ही नवी भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहे. देशातील तरुण पिढी आपल्या डोळ्यांसमोर अंमली पदार्थांच्या मागे वाया जात आहे. प्रशासन वारंवार ड्रग्जचा धंदा करणाऱ्यांवर कारवाई करते. पण जो पर्यंत त्याची मागणी वाढत राहिल तो पर्यंत हा अनधिकृत व्यवसाय रोखता येणार नाही. अन् यासाठी लोकांना जागृत करायला हवं. व्यसन करण्याचे विपरित परिणाम त्यांना समजावून सांगायला हवे. त्यासाठी पंकजनं हे नवं आव्हान स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या