जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना नोकरांच्या भूमिका का देतात? अशोक सराफांनी सांगितलं सत्य

बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना नोकरांच्या भूमिका का देतात? अशोक सराफांनी सांगितलं सत्य

बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना नोकरांच्या भूमिका का देतात? अशोक सराफांनी सांगितलं सत्य

मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये कायम नोकरांच्याच भूमिका का दिल्या जातात? यामागचं खरं कारण अशोक सराफ यांनी सांगितलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 27 जून: अशोक सराफ (Ashok Saraf) हे मराठी सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या अनोख्या विनोदी शैलीच्या जोरावर तब्बल तीन दशकं मराठी प्रेक्षकांना खळखळवून हसवलं. त्यांचे ‘बनवाबनवी’, ‘गंमत जंमत’, ‘धुमधडाका’, ‘एक डाव भुताचा’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ (‘Banwa Banwi’, ‘Gammat Jammat’, ‘Dhumdhadaka’, ‘Ek Daav Bhutacha’, ‘Navri Mile Navryala’) असे कित्येक चित्रपट आहेत जे आजही तितक्याच आवडीनं पाहिले जातात. मराठीसोबतच त्यांनी हिंदीमध्ये देखील आपलं नशीब आजमावून पाहिलं. परंतु त्यांना तिथं हव्या तशा भूमिका साकारण्याची संधी मिळाली नाही. अन् यामागे एक चक्रावून टाकणारं कारण आहे. मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये कायम नोकरांच्याच भूमिका का दिल्या जातात? यामागचं खरं कारण अशोक सराफ यांनी सांगितलं. चाहत्यांची अनोखी जिद्द; राम चरणला शुभेच्छा देण्यासाठी 231KM केला पायी प्रवास

‘कभी खुशी कभी गम’मधील ‘POO’ बॉलिवूडमधून गायब, सांगितलं चकित करणारं कारण सह्याद्री वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये दुजाभाव का दिला जातो? याचं खरं कारण सांगितलं. ते म्हणाले, “मराठी ही अत्यंत प्रयोगशील मनोरंजनसृष्टी आहे. नाटक असो, मालिका असो की चित्रपट मराठीत पटकथांना फार महत्व दिलं जातं. इथे कथाच खरी हिरो असते. अन् त्या कथेच्या अनुशंगानं कलाकारांना काम मिळतं. परंतु बॉलिवूडमध्ये तसं नाही. तिथे हिरोंना अधिक महत्व दिलं. रोल साध्या माणसाचा असला तरी देखील हिरो रुबाबदार, सुंदर असा दिसतो. अर्थात ग्लॅमर हाच बॉलिवूडचा क्रेंद्रबिंदू आहे. त्यामुळं मराठीतील अनेक कलाकार त्यांच्या या व्याख्येत बसत नाहीत. कारण मराठी प्रेक्षक रंगरुप पाहून नाही तर कलाकाराचा अभिनय पाहून त्याच्यावर प्रेम करतात. त्यामुळं मराठीतील अनेक लोकप्रिय कलाकार हे सर्वसामान्यच दिसतात. अन् त्यांचं ते सामान्यत्व बॉलिवूडला नको आहे. त्यामुळं मराठी कलाकारांना नेहमीच नोकर किंवा तत्सम दुय्यम रोल दिले जातात. अर्थात नाना पाटेकर, स्मिता पाटील, अमोल पालेकर यांसारखे काही कलाकार त्याला अपवाद आहेत.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात