JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Ibrahim Ali Khan सोबतच्या फोटोबाबत Palak Tiwari चा खुलासा, म्हणाली- 'आईपासून लपण्यासाठी...'

Ibrahim Ali Khan सोबतच्या फोटोबाबत Palak Tiwari चा खुलासा, म्हणाली- 'आईपासून लपण्यासाठी...'

काही दिवसांपूर्वी टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी (Shweta Tiwari Daughter) आणि अभिनेत्री पलक तिवारी सैफ अली खानचा मुलगा इब्राइम अली खानसह मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट झाली होती. त्याबाबत पलक तिवारीने खुलासा केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 एप्रिल: काही दिवसांपूर्वी टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी (Shweta Tiwari Daughter) अभिनेत्री पलक तिवारी (Palak Tiwari Latest News) आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राइम अली खान (Saif Ali Khan Son Ibrahim Ali Khan) मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट झाले होते. बरेच दिवस याबाबत कोणतेही भाष्य न केल्यानंतर पलकने मौन सोडले आहे. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत पलकने इब्राहिमसोबत स्पॉट (Ibrahim Ali Khan and Palak Tiwari spotted outside restaurant in Mumbai) झाल्यानंतर तिचा चेहरा का लपवला होता याबद्दल खुलासा केला. तिच्या म्हणण्यानुसार, तिने तिच्या आईला सांगितले होते की ती तासाभरापूर्वीच ती घराकडे यायला निघाली आहे. पण जेव्हा तिने असे सांगितले तेव्हा ती मुंबईतील वांद्रे याठिकाणीच होती. जेव्हा पापाराझींनी त्यांचे फोटो क्लिक केले, तेव्हा पलकने खुलासा केला की तिला भीती वाटत होती की तिची आई फोटो बघेल आणि तिचं खोट उघडकीस येईल. अर्थात पलकच्या म्हणण्यानुसार आईपासून लपण्यासाठी तिने चेहरा झाकून घेतला होता. हे वाचा- Pushpa ‘झुकेगा नही’! मोठी रक्कम मिळत असूनही Allu Arjun ने रिजेक्ट केली तंबाखू ब्रँडची ऑफर तिने इब्राइमसह असणाऱ्या नात्याबाबतही भाष्य केले. तिने सांगितल्यानुसार पलक आणि इब्राइम केवळ चांगले मित्र आहे. पलकने त्याला ‘Sweet Guy’ असे देखील म्हटले आहे. तिने पुढे म्हटले की यापेक्षा जास्त काही नाही आहे. कधीकधी त्याच्यासह केवळ बोलायला आवडते, असेही ही अभिनेत्री म्हणाली. हे वाचा- ‘तू माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग…’ म्हणत ‘लागिर झालं जी’ फेम अज्याची श्वेता खरातसाठी खास पोस्ट वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास पलक हॉरर-थ्रिलर ‘रोझी: द सेफ्रॉन चॅप्टर’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. विशाल मिश्रा दिग्दर्शित या चित्रपटात विवेक ओबेरॉय देखील मुख्य भूमिकेत आहे. यात मल्लिका शेरावत आणि अरबाज खान यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तर दुसरीकडे इब्राहिम करण जोहरला त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात असिस्ट करत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या