जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तू माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग...' म्हणत 'लागिर झालं जी' फेम अज्याची श्वेता खरातसाठी खास पोस्ट

'तू माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग...' म्हणत 'लागिर झालं जी' फेम अज्याची श्वेता खरातसाठी खास पोस्ट

'तू माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग...' म्हणत 'लागिर झालं जी' फेम अज्याची श्वेता खरातसाठी खास पोस्ट

मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक कलाकरांमध्ये घट्ट मैत्री असलेली पाहायला मिळते. त्यांची मैत्री पाहून कधी-कधी त्यांच्यामध्ये काहीतरी शिजत असल्याची शंका त्यांच्या चाहत्यांना येते. असंच काहीसं नातं ‘लागीर झालं जी’ (Lagir Zal Ji) फेम नितीश चव्हाण (Nitish Chavan) आणि श्वेता खरात (Shweta Kharat Birthday) यांच्यात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 एप्रिल- मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक कलाकरांमध्ये घट्ट मैत्री असलेली पाहायला मिळते. त्यांची मैत्री पाहून कधी-कधी त्यांच्यामध्ये काहीतरी शिजत असल्याची शंका त्यांच्या चाहत्यांना येते. असंच काहीसं नातं ‘लागीर झालं जी’ (Lagir Zal Ji)  फेम नितीश चव्हाण   (Nitish Chavan)  आणि श्वेता खरात  (Shweta Kharat Birthday)  यांच्यात आहे.आज श्वेताचा वाढदिवस आहे. या खास दिवसाचं निमित्त साधत नितीशने आपली खास मैत्रीण श्वेतासाठी फारच सुंदर पोस्ट लिहिली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नितीश चव्हाणने श्वेता सोबतच्या फोटोंचा सुंदर व्हिडीओ बनवून आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नितीश चव्हाण इन्स्टा पोस्ट- इन्स्टाग्रामवर नितीशने व्हिडीओ शेअर करत, एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे, ‘’“श्वेता the fighter"तुझा आज वाढदिवस,खास दिवस,जन्मदिवस आज या निमित्ताने तुला सांगावस वाटतंय की तुला fighter यासाठी म्हंटलो कारण इतकी वर्ष मी तुला बघत आलोय,आपण एकत्र करिअर ची सुरुवात केली या प्रवासात किती चढ उतार आले,किती अवघड परिस्थिती आली पण त्यावर तू मात केलीस आणि आज तू जे काही आहेस ते फक्त आणि फक्त तू घेतल्याला मेहनतीमुळे आणि सातत्यामुळे.तुझ्या बरोबर राहून तुझ्याकडून खूप काही शिकलो. तुझ्यात ती positive energy आहे, तुझ्यात तो गोडवा आहे, तुझ्यात ती परिस्थितीवर मात करण्याची ताकद आहे. तू कधीच give up करत नाहीस. तू जिथे गेलीयेस तिथे तू तुझी छाप पाडलेली आहेस.

जाहिरात

तू माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग आहेस. तू कायम खुष रहा☺️, निरोगी रहा, आंनदी रहा आणि मुख्य म्हणजे कायम हसत रहा कारण तू जिथे असतेस तिथंल वातावरण आपोआप हसत खेळत राहतं हे माहितेय मला आणि अजून एक कारण हसत रहा कारण हसल्यावर तुझी डिंपल दिसते .स्वामींच्या आणि आई तुळजाभवानीच्या कृपेने तुझी अशीच उत्तरोउत्तर प्रगती होत जातो, तुला उदंड आयुष्य देवो’’. आता माझ्या style मध्ये Many many वाढदिवसाच्या hardik मुबारकं … Luv uuuu .. god bless uu.. Enjoy your day’’ असं म्हणत नितीशने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

नितीश आणि श्वेता सोशल मीडियावर फारच सक्रिय असतात. दोघे सतत एकमेकांसोबत डान्स व्हिडीओ बनवत असतात. त्यांच्या डान्सचे रोमँटिक व्हिडीओ पाहून, हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातं. परंतु या दोघांनी कधीच याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाहीय. हे दोघेही आपण चांगले मित्र असल्याचं सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात