मुंबई 6 सप्टेंबर : बॉलिवूडचं पॉवरकपल अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) यांची लव्हस्टोरी जगजाहीर आहे. शाहरुख आणि गौरीचं एकमेकांवर सुरूवातीपासूनच खूप प्रेम होतं. तर त्यांनी प्रेमविवाह केला होता. शाहरुखने गौरीसाठी दिल्ली ते मुंबई असा प्रवास देखील केला होता. अखेर त्यांनी आपलं प्रेम टिकवलं देखील. आजही हे कपल बॉलिवूडचं प्रसिद्ध कपल आहे. गौरी ही पंजाबी कुटुंबातील होती. पण लग्नावेळी तिने शाहरुखसाठी आपलं नावही बदललं होतं. त्यांचा निकाह होताना गौरीचं नाव आयशा ठेवण्यात आलं होतं. लग्न पार पडल्यानंतर गौरीच्या कुटुंबियांनी सगळ्यांसाठी एक जंगी पार्टी ठेवली होती. त्यावेळी असा किस्सा घडला होता की शाहरुखने सगळ्यांसमोरच गौरीला बुरखा घालण्यास सांगितला होता. हे ऐकून गौरीचे कुटुंबिय मोठ्या चिंतेत पडले होते.
घुंगट आणि लाल लेहंगा, Bridal Look मध्ये दिसली आदिती राव हैदरी, PHOTO Viralदरम्यान शाहरुखने स्वतःच या गोष्टीचा खुलासा केला होता. फरिदा जलाल यांच्या एका जुन्या चॅट शोमध्ये त्याने या घटनेविषयी सांगितलं होतं. तो म्हणाला, “मला आठवतंय जेव्हा या खास क्षणासाठी सगळे कुटुंबिय उपस्थित होते. त्यात काही जुन्या विचारांचे लोकही उपस्थित होते. मी त्या सगळ्यांचा आदर करतो. त्यांच्या विचारांचा आदर करतो. जेव्हा माझी एन्ट्री झाली तेव्हा सगळे माझ्याकडे पाहून बोलू लागले, हा मुलगा मुस्लिम आहे. हा गौरीचं नाव बदलणार का? गौरीचं मुसलमान होणार का?”
त्यानंतर शाहरुखने सगळ्यांची फिरकी घ्यायचं ठरवलं. तो म्हणाला, “गौरीकडचे सगळे पंजाबीमध्ये बोलत होते. मी घड्याळात वेळ पाहिली, 1:15 झाले होते. मग मी एकदम गंभीर होत म्हटलं, चल गौरी बुरखा घाल. नमाजची वेळ झाली आहे. हे ऐकून गौरीचे सगळे नातेवाईत माझ्याकडे हैराण होऊन पाहू लागले. ते हैराण होते की, गौरीने नाव बदललं आहे, धर्मही बदलला आहे तर मी असं करेल का?” दरम्यान शाहरुखचा हा एक प्रँक होता. गौरी आणि शाहरुखचं 25 ऑक्टोबर 1991ला लग्न झालं होतं. त्यापूर्वी जवळपास 6 वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. त्यांना आता तीन मुलं देखील आहेत.