JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / नुसरत जहाचा बेबी बम्प PHOTO VIRAL; अभिनेत्री गर्भवती असल्याची बातमी खरी

नुसरत जहाचा बेबी बम्प PHOTO VIRAL; अभिनेत्री गर्भवती असल्याची बातमी खरी

TMC खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहांचा बेबी बंम्प फोटो व्हायरल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 12 जून : तृणमुल काँग्रेसची (TMC) खासदार आणि प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री नुसरत जहां (Nusrat Jahan) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे भलतीच चर्चेत आली आहे. तर तिच्या लग्नावरून मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. तिने धुमधडाक्यात केलेलं लग्न नाकारलं आहे. तर आता ती गर्भवती असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्या संदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. नुसरत सहा महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. पण आता नुसरतचा बेबी बम्प (Baby Bump) असलेला एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामुळे नुसरतच्या गर्भवती असण्याची बातमी खरी असल्याचं समोर येत आहे. पण अद्याप नुसरतने याविषयी स्वतः कोणताही खुलासा केला नाही. (Nusrat Jahan pregnant) नुसरतचा हा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत तिच्यासोबत श्रांभती चॅटर्जी देखील उपस्थित आहे. पण नुसरतचा पूर्वपती निखिल जैनने (Nikhil Jain) आधीच या प्रेग्नंसी विषयी खुलासा करत आपल्याला याविषयी काहीही माहित नसल्याचं म्हटलं होतं. तसेच त्या दोघांमध्ये मागील वर्षभरापासून वादविवाद सुरू असून ते 6 महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहे. त्यामुळे हे मुलही त्याचं नसल्यांच त्याने स्पष्ट केलं होतं.

निखिल आणि नुसरतचा हा वाद सध्या दिवसेन् दिवस वाढतच आहे. नुसरतने निखिलवर तिचे पैसे, दागिणे घेतल्याचा आरोप लावला होता. पण निखिलने आपणच तिला कर्ज फेडण्यासाठी पैसे दिले होते असं म्हणत आरोप फेटाळले होते.

किमी काटकर ते ममता कुलकर्णी ‘या’ अभिनेत्री बॉलिवूडमधून अचानक झाल्या गायब; पाहा कोण कोण आहेत

या दोघांमध्ये आता अभिनेता यश दासगुप्ता (Yash Dasgupta)  याचही नाव येत आहे. व नुसरत आणि यशच्या अफेअर्सच्या चर्चा ही सुरू होत्या. त्यामुळे निखिल आणि नुसरतच्या नात्यातील दुरावा हा यशमुळेचं आला असल्याचही म्हटलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या