मुंबई, 19 जुलै : या वर्षातील मल्टिस्टारर चित्रपट भुजः द प्राइड ऑफ इंडिया याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात नोरा फतेही हिना रहमान ही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. याचा फस्ट लुक अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. दरम्यान नोराने चित्रपटामधील एक किस्सा शेअर केला आहे. या चित्रपटात नोराच्या चेहऱ्यावर एक जखम दाखवली आहे. मात्र चित्रपटादरम्यानच तिच्यासोबत दुर्घटना घडली होती. त्यामुळे नोराने खऱ्या जखमेसह चित्रपटाच शूटिंग केलं. सेटवर झालेल्या दुर्घटनेविषयी सांगताना नोरा म्हणाली की, आम्ही एका अॅक्शन सीनचं शूटिंग करीत होता. डायरेक्टर एका टेकमध्येच संपूर्ण सीन शूट करू इच्छित होते. मी आणि माझे सहकलाकार आम्ही या सीनचा सराव केला. या सीनमध्ये त्यांनी माझ्या कपाळावर बंदुक धरली होती. ती बंदुक घेऊन मला त्यांना मारहाण करायची होती. सराव तर चांगला झाला होता. मात्र टेकदरम्यान सहकलाकाराने चुकून वजनदार बंदुक माझ्या चेहऱ्यावर फेकली आणि बंदुक माझ्या कपाळावर जोरात लागली. त्यामुळे माझ्या कपाळावर जखम झाली आणि खूप रक्त वाहू लागलं.
त्यानंतर तातडीने नोराला रुग्णालयात हलविण्यात आलं. जखम खोल झाल्यामुळे खूप रक्त गेलं होतं. त्यामुळे ती बेशुद्ध झाली होती. मात्र हा अपघात चित्रपटासाठी उपयुक्त ठरला. चित्रपटाच्या एक सीनसाठी नोराला वीएफएक्सच्या माध्यमातून कपाळावर जखम झाल्याचं दाखवायचं होतं. या सीनसाठी नोराने खऱ्या जखमेचा वापर केला. हे ही वाचा-
Video: मिकाच्या मदतीसाठी धावले 200 लोक; भर पावसात भिजत केली गायकाची मदत
आणखी एक किस्सा सांगताना नोरा फतेही म्हणाली, त्या दिवशी आम्ही आणखी एका अॅक्शन सीनसाठी शूटिंग केलं. तो एक चेंज सीक्वेंन्स होता. ज्यात धावणे, जलद गतीने चालण्याची मागणी होती. शूटिंगदरम्यान माझ्या बोटांना खूप मार लागला होता. त्यामुळे अख्खा वेळ मला स्लिंग घालावी लागली. हे शारीरिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक होतं. मात्र सर्व सीन मी स्वत: केले. स्टंट डबलचा उपयोग न करता सर्व सीन्स स्वत:च केले होते.