मुंबई 8 जून**:** नागिण या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता पर्ल व्ही पुरी (Pearl V Puri) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका 12 वर्षांच्या मुलीसोबत लैंगिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. (Pearl Puri Rape Case) या प्रकरणी सध्या तो मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान या प्रकरणावरुन अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) आणि निया शर्मा (Nia Sharma) यांच्यात ट्विटर वॉर सुरु झालं आहे. एकिकडे नियानं जाहीररित्या पर्लला पाठिंबा दिलाय तर दुसरीकडे देवोलिना मात्र त्याला पाठिंबा देणाऱ्या सेलिब्रिटींवर टीका करतेय. केलेल्या कर्माची फळ इथेच भोगावी लागतात असा जोरदार टोला तिनं लगावला आहे. दोन्ही अभिनेत्रींची कॅट फाईट सध्या चर्चेत आहे. “तुमचा सोशल मीडियावरील आवाज त्याला कुठल्याही प्रकराची मदत करु शकणार नाही. तुम्ही एका लहान मुलीवर आरोप करताय तुम्हाला तुमच्या कर्माची फळ भोगावीच लागतील. किती विचित्र लोक आहात तुम्ही सगळे विरोध करायचाच असेल तर आंदोलन करा, उपोषण करा पण इथं सोशल मीडियावर अशी दुर्गंधी पसरवू नका.” अशा आशयाचं ट्विट देवोलिना हिनं केलं होतं. अनन्यासोबत तुम्ही देखील योगाभ्यास करणार नं? पाहा श्रीमंताघरची सून शिकवतेय वज्रासन
OMG! ही अभिनेत्री कि जलपरी? खोल समुद्रातील VIDEO पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का यावर तिला नियानं, “ताईला कोणीतरी सांगा, उपोषण किंवा कँडल मार्च काढण्यासाठी सध्या परवानगी मिळणार नाही. देशात सध्या कोरोनाचं संक्रमण सुरु आहे. शिवाय ताईला डान्स रिल शेअर करण्यापूर्वी सराव करण्याची गरज आहे. सध्या तू त्याच्यावरच लक्ष केंद्रित कर.” अशा आशयाचं ट्विट करुन प्रत्युत्तर दिलं. मात्र तिचं हे ट्विट पाहून देवोलिना आणखी संतापली अन् हे ट्विटर वॉर आणखी पुढे गेलं. श्वेता तिवारीची उडाली झोप; या कारणामुळं रात्रभर सुरू ठेवावा लागतो व्हिडीओ कॉल
तिनं “माझे सर्व ट्विट्स त्या सात वर्षांच्या मुलीला ट्रोल करणाऱ्यांविरोधात होते. जे त्या लहान मुलीला गोल्ड डिगर म्हणत आहेत. तुला मिरची का लागली? तुला खरंच या प्रकरणातलं काही माहित आहे की उगाचच अर्धवट माहितीच्या आधारावर ट्विट करते आहेत.” अशा आशयाची दोन् ट्विट्स करुन नियाचा चांगलाच समाचार घेतला. मात्र यापुढे नियानं अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळं नियाचे चाहते आता ती काय बोलणार याकडे लक्ष ठेवून आहेत. या दोन्ही अभिनेत्रीचे ट्विट्स सध्या सर्वत्र चर्चेत आहेत.