JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मार्व्हलला पडली हिंदू संस्कृतीची भुरळ; बिग बजेट सुपरहिरोपटात झळकणार भारतीय

मार्व्हलला पडली हिंदू संस्कृतीची भुरळ; बिग बजेट सुपरहिरोपटात झळकणार भारतीय

मार्व्हेल स्टुडिओजच्या चित्रपटात दिसणार भारतीय हिंदू संस्कृती. त्या दृष्याने मोठी चर्चा रंगली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 मे : जगप्रसिद्ध अशा मार्व्हेल स्टुडिओजचा (Marvel Studios)  नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतच चित्रपटाचं ट्रेलरही प्रदर्शित झालं आहे. पण त्यातील एका दृष्याने साऱ्यांचच लक्ष वेधलं आहे ते म्हणजे हिंदू संस्कतीचं दिसलेलं चित्र. ‘इटर्नल्स’ (Iternals)  हा नवा चित्रपट मार्व्हेल स्टुडिओ घेऊन येत आहे. त्यातीलच या दृष्टाची विशेष चर्चा रंगली आहे. मार्व्हेल स्टुडिओने आजवर अनेक जगप्रसिद्ध असे चित्रपट दिले आहेत. त्यांचे चित्रपट हे जगभरात पाहिले जातात तसेच पसंत ही केले जातात. यातीलच बहूप्रतिक्षित ‘इटर्नल्स’ हा चित्रपट आहे. (Iternals trailer out)

हे फाटके कपडे का घातलेस? राखी सावंतच्या विचित्र फॅशनवर पडतोय प्रश्नांचा पाऊस

ट्रेलर वरून चित्रपटात काही पुरातन काळही दाखवण्यात आल्याचं समजतं आहे. तर एका दृष्यात एक कपल एकमेकांच्या प्रेमात असून ते काही वर्षांच्या अंतराने ते एकमेकांसोबत विवाह करतात व तो विवाह ते हिंदू संस्कृतीला (Iternal shows hindu culture) अनुसरून असल्याचं दिसत आहे. यात त्यांनी एकमेकांच्या गळ्यात झेंडूच्या फुलांचे हार घातले आहेत, तसेच अभिनेत्रीने डोक्यावर पदरही घतला आहे. त्यामुळे हे दृष्य भारतीय प्रेक्षकांसाठी विशेष ठरत आहे.

मार्व्हेलच्या इतर चित्रपटांपेक्षा हा चित्रपट अतिशय वेगळा आहे. तर हा नक्की कोणत्या कथेवर आधारीत आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. चित्रपटात अभिनेत्री अँन्जोलिना जोली (Angelina Jolie) , कीट हॅरिंग्टोन, रिचार्ड मॅडन, जेम्मा चॅन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय भारतीय अभिनेता हरिश पटेल (Harish Patel)  हा देखिल चित्रपटात दिसणार आहे.

‘यापुढे सलमानशी पंगा नकोच’; मानहानीचा दावा ठोकताच अभिनेत्यानं घेतली माघार

दिग्दर्शक क्लोइ झाओ (Chloe Zhao) यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून मार्व्हेल स्टुडिओने चित्रपटाती निर्मिती केली आहे. नोव्हेंबर महिन्यात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या