JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / या गाण्यामुळं नेहा कक्करला मिळालं होतं Indian Idolचं तिकिट; पाहा 14 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ

या गाण्यामुळं नेहा कक्करला मिळालं होतं Indian Idolचं तिकिट; पाहा 14 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ

OMG! पाहा कशी दिसतेय नेहा कक्कर; 14 वर्षांपूर्वीचा पहिल्या ऑडिशनचा VIDEO VIRAL

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 6 जून**:** नेहा कक्कर (Neha kakkar) ही बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची गायिका म्हणून ओळखली जाते. आपल्या सुरेल आवाजानं रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ही गायिका गाण्यांसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. आज नेहाचा वाढदिवस आहे. 33 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आपल्या ग्लॅमरस जीवनशैलीनं चाहत्यांना आश्चर्यचकित करणाऱ्या नेहाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Neha Kakkar video viral) सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ आहे नेहाच्या पहिल्या ऑडिशनचा (Neha Kakkar first audition in Indian idol). ऑडिशनमध्ये गायलेल्या या गाण्यामुळंच तिला इंडियन आयडलचं तिकिट मिळालं होतं. अन् पुढे इंडियन आयडल जिंकून तिनं बॉलिवूडच्या दिशेने आपला प्रवास सुरु केला. या व्हिडीओमधील नेहाची जिद्द आणि चिकाटी पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. नेहा आज बॉलिवूडमधील एक लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते. तिने 2006 साली इंडियन आयडॉल या रिअॅलिटी शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. फेसबुकवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ नेहाच्या पहिल्या ऑडिशनचा आहे. त्यावेळी नेहा अकरावीत शिकत होती. ती बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय गायिका होण्याची स्वप्नं पाहत होती. अन् तिच स्वप्नं उराशी बाळगून तिनं इंडियन आयडॉलमध्ये एण्ट्री घेतली. पुढे पाहता पहाता सुरेल आवाजाच्या जोरावर तिनं इंडियन आयडॉलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. नेहाचा हा संपूर्ण सुरेल प्रवास या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आला आहे. ‘बॉलिवूडमध्ये हाच एक मर्द, बाकीचे…’; केआरकेने अभिनेत्यावर केला कौतुकाचा वर्षाव

‘पानी की ध्वनी..ओह सो सनी..’ साराची कविता ऐकून नेटकऱ्यांना येतेय आठवलेंची आठवण नेहानं 2008 साली मिराबाई नॉटआऊट या चित्रपटात हे राम हे गाणं गाऊन आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिनं ब्लू, बाल गणेश, पंगा गँग यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली. नेहाला खरी लोकप्रियता मिळाली ती यारिया या चित्रपटातील सनी सनी या गाण्यामुळे. अन् त्यानंतर पुढील सहा वर्षात तिनं तब्बल 50 पेक्षा अधिक चित्रपटांसाठी सुरेल गाणी गायली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या