जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘बॉलिवूडमध्ये हाच एक मर्द, बाकीचे...’; केआरकेने अभिनेत्यावर केला कौतुकाचा वर्षाव

‘बॉलिवूडमध्ये हाच एक मर्द, बाकीचे...’; केआरकेने अभिनेत्यावर केला कौतुकाचा वर्षाव

‘बॉलिवूडमध्ये हाच एक मर्द, बाकीचे...’; केआरकेने अभिनेत्यावर केला कौतुकाचा वर्षाव

अर्जुननं फोन करुन त्याला धीर दिला. परिणामी खुश झालेल्या केआरकेने केवळ अर्जुनच बॉलिवूडमधील खरा मर्द आहे असं म्हटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 5 जून**:** कमाल आर खान (KRK) उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतो. देशभरात घडणाऱ्या घडामोडिंपासून बॉलिवूडमधील घराणेशाहीपर्यंत विविध विषयांवर तो रोखठोकपणे आपली प्रतिक्रिया देतो. अनेकदा यामुळं त्याला ट्रोल देखील केलं जातं. अन् यावेळी तर सलमान खाननं (Salman Khan) त्याच्या विरोधात चक्क मानहानिचा दावा ठोकला आहे. मात्र या प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता अर्जून कपूर (Arjun Kapoor) त्याच्या मदतीला धावून गेला. अर्जुननं फोन करुन त्याला धीर दिला. परिणामी खुश झालेल्या केआरकेने केवळ अर्जुनच बॉलिवूडमधील खरा मर्द आहे असं म्हटलं आहे. “खूप खूप धन्यवाद अर्जुन कपूर. तू मला फोन केलास आणि माझ्यासोबत सद्य परिस्थितीवर चर्चा केलीस. तूच आहेस माझा खरा मित्र. तू बॉलिवूडमधील खरा मर्द आहेस. जो कोणालाही घाबरत नाही. यापुढे मी तुझ्या कुठल्याच चित्रपटावर टीका करणार नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन केआरकेनं अर्जुन कपूरची स्तुती केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. श्वेता तिवारीच्या मुलीचं Insta Comeback, लवकरच होणार आहे बॉलिवूडमध्ये एंट्री

null

‘पानी की ध्वनी..ओह सो सनी..’ साराची कविता ऐकून नेटकऱ्यांना येतेय आठवलेंची आठवण काही दिवसांपूर्वीच केआरकेने सलमान खानवर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला होता. यानंतर सलमान खानच्या टीमने कायदेशीर पावलं उचलत केआरकेवर मानहानीचा खटला दाखल केला. केआरकेने सलमान खानच्या काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटावर सडकून टीका केली होती. त्यामुळं सध्या तो कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. अन् या परिस्थितीत बॉलिवूडमधील कोणीच व्यक्ती त्याच्या मदतीला पुढे येण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत अर्जुन कपूरनं त्याला धीर दिला त्यामुळं यापुढे त्याच्यावर टीका न करण्याचं वचन त्यानं दिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात