JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / लग्नाच्या 6 महिन्यांतच रोहनप्रीत-नेहा कक्करमध्ये राडा; नवरा-बायकोच्या हाणामारीचा VIDEO VIRAL

लग्नाच्या 6 महिन्यांतच रोहनप्रीत-नेहा कक्करमध्ये राडा; नवरा-बायकोच्या हाणामारीचा VIDEO VIRAL

नेहानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आपल्या पतीसोबत चक्क मारामारी करताना दिसत आहे. (Neha Kakkar fight with husband rohanpreet)

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 12 मे**:** नेहा कक्कर (Neha Kakkar) ही सध्याची बॉलिवूडमधील आघाडिची गायिका म्हणून ओळखली जाते. तिनं आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर अल्पावधित बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु ती गाण्यांसोबतच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळं देखील कायम चर्चेत असते. लग्नापूर्वी ती आपल्या ब्रेकअपमुळं चर्चेत असायची. तर लग्नानंतर आता ती पतीसोबत केलेल्या भांडणांमुळं चर्चेत असते. नेहानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आपल्या पतीसोबत चक्क मारामारी करताना दिसत आहे. (Neha Kakkar fight with husband rohanpreet) चाहत्यांनी घाबरण्याचं कारण नाही. कारण नेहाच्या सुखी संसाराला अद्याप कुणाचीही नजर लागलेली नाही. किंवा त्यांच्या नात्याला तडा गेलेला नाही. खरं तर हा त्यांच्या आगामी म्युझिक व्हिडीओच्या प्रमोशनसाठी तयार केलेला व्हिडीओ आहे. ‘खड तैनू मैं दस्सा’ (Khad Tainu Main Dassa) या म्युझिक व्हिडीओची झलक नेहाने इन्स्टाग्रामवर दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये दोघांमध्ये तूफान हाणामारी होताना दिसते. अगदी एकमेकांचे गळे पकडून झिंज्या उपटण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याचं दिसतं आहे. ऐकूनच म्हणाल व्वा उस्ताद! ना म्युझिक, ना कोरस; तरुणानं गायलं ‘बाहुबली’मधील अवघड गाणं

संबंधित बातम्या

नेहाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी देखील नेहानं बेबी बंप फ्लॉन्ट करत पती रोहनप्रीतसोबत एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला होता. या फोटोसोबत नेहाने ‘ख्याल रखया कर’ असं कॅप्शन दिलं होतं. परंतु नंतर तो एका व्हिडीओच्या प्रमोशनसाठी काढलेला फोटो होता असं सिद्ध झालं. असाच काहीसा प्रकार यावेळेसही घडला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या