JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / नेहा धुपियानं पुन्हा दिली Good News; दुसऱ्यांदा होणार आई

नेहा धुपियानं पुन्हा दिली Good News; दुसऱ्यांदा होणार आई

अंगद आणि मेहरही नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आनंदी दिसत आहे. (Neha Dhupia ready for second child) परिणामी चाहत्यांनी देखील या फोटोवर प्रतिक्रिया देत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 19 जुलै**:** बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) पुन्हा गोड बातमी देण्यासाठी सज्ज आहे. तिने पती अंगद आणि मुलगी मेहरसोबतचा एक फोटो शेअर करत दुसऱ्यांदा आई होणार असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. (Neha Dhupia Pregnant) या फोटोत नेहा धुपियाचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे. अंगद आणि मेहरही नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आनंदी दिसत आहे. (Neha Dhupia ready for second child) परिणामी चाहत्यांनी देखील या फोटोवर प्रतिक्रिया देत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. नेहाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. या फोटोला काय कॅप्शन देऊ कळत नाही. आम्ही खूप विचार केला, अन्… शेवटी सर्वात चांगलं वाटतं ते हेच.. देवा तुझे खूप खूप आभार अशा आशयाचं कॅप्शन नेहाने या फोटोवर दिलं आहे. वनिता खरात कशी झाली हास्यक्वीन? त्या न्यूड फोटोमुळे उडवली होती खळबळ

संबंधित बातम्या

मोनालिसाचं बेडरूम आहे खूपच सिंपल; पाहा आलिशान घराचे Inside Photos नेहा धुपिया कधीकाळी बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. मॉडलिंगमधून करिअरची सुरुवात करणारी नेहा 2002 साली मिस इंडिया ही सौंदर्य स्पर्धा जिंकून पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती. तिने कयामत या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. नेहाने 10 मे 2018 रोजी अंगद बेदीशी लग्न केले. त्यांना मेहेर नावाची एक मुलगी आहे अन् आता हे कपल दुसऱ्या बाळाचं स्वागत करण्यासाटी सज्ज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या