नवाजुद्दीन सिद्दीकी
मुंबई, 20 फेब्रुवारी :बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत आहे. सध्या त्याच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे, त्याच्या पत्नीने अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. याआधी नवाजुद्दीनच्या आईने तिची सून आलियाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आलियानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली व्यथा मांडली. तिच्या या पोस्ट सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. काही लोक तिला पाठींबा देत आहेत तर नवाजुद्दीनचे चाहते तिला ट्रोल देखील करत आहेत. अशातच आता नवाजुद्दीन विषयी एक नवी माहिती समोर आली आहे. यावरून त्याच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. एकीकडे नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर आता दुसरीकडे घरकाम करणाऱ्या महिलेनं तिला दुबईत एकटे सोडल्याचा आणि पगार न दिल्याचा आरोप केला त्याच्यावर केला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीची मोलकरीण सपना रॉबिन हिचा रडताना आणि मदतीची याचना करतांनाचा एक व्हिडिओ नवाजची पत्नी आलिया सिद्दीकीचा वकील रिझवान यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. यासोबतच वकिलाने एक लांबलचक स्टेटमेंटही जारी केले आहे, ज्यामध्ये अभिनेत्याने सपनाला चुकीच्या पद्धतीने कामावर घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. हेही वाचा - Rakhi Sawant: नवऱ्याला तुरुंगात भेटायला गेली राखी; तिथे जे घडलं त्याचा खुलासा करत म्हणाली ‘त्याने माझ्यासोबत…’ आलिया सिद्दीकीचा वकील रिझवान यांनी दावा केला आहे की, नवाजुद्दीन सिद्दीकीने दुबईच्या रेकॉर्डमध्ये सपनाचा एका अज्ञात कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून उल्लेख केला होता. तर प्रत्यक्षात अभिनेत्याने आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी सपनाला कामावर ठेवलं होते. सपना दुबईत नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आणि मुलांसोबत राहत होती. तर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सपना म्हणतेय, ‘मी नवाजुद्दीन सरांच्या घरी काम करते. मॅडम गेल्यानंतर सरांनी मला व्हिसा दिला होता आणि माझ्या पगारातून व्हिसाचे पैसे कापून घेतील असे सांगितले होते. पण मला दोन महिन्यांपासून मला पगार मिळाला नाही आणि त्यामुळे मला खूप अडचणी येत आहेत . सध्या मी दुबईत एकटीच आहे. माझ्याकडे खायला काही नाही.’
ती पुढे म्हणतेय कि, ‘माझ्याकडे एक पैसाही नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की मला येथून बाहेर काढा आणि माझा पगार फायनल करा. मला भारतात माझ्या घरी जायचे आहे. मला बसचे तिकीट हवे आहे आणि माझा पगार हवा आहे.’ हा व्हिडीओ आणि स्टेटमेंट शेअर करण्यासोबतच आलियाच्या वकीलाने मुलीला वाचवण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची विनंती अधिकाऱ्यांना केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2021 मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया आणि शोरा दुबईला गेले होते अशी माहिती समोर येत आहे. पण आलिया जानेवारी 2023 मध्ये भारतात परतली आणि तेव्हापासून तिचे पती आणि सासरच्यांसोबत भांडण होत आहे. आता हे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं आहे. आता नवाजुद्दीन सिद्दीकी या सगळ्या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देणार ते पाहणं महत्वाचं आहे.