JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / OTT वर इतक्या कोटींना विकला गेला 'झुंड'; थिएटरमध्ये पाहायला मिळणार की नाही?

OTT वर इतक्या कोटींना विकला गेला 'झुंड'; थिएटरमध्ये पाहायला मिळणार की नाही?

महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी आता 50% क्षमतेने थिएटर्स खुले झाले आहेत. त्यामुळे निर्माते राज्यात चित्रपटगृह सुरू होण्याची वाट पाहत असल्याचं सांगितलं जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 21 ऑगस्ट : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) आणि सैराट चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजूळे (Nagraj Manjule) यांचा बहूचर्चित आणि बहूप्रतिक्षित चित्रपट ‘झुंड’ (Zhund) आता प्रदर्शनासाठी सज्ज आहे. दरम्यान अनेक ठिकाणी अद्यापही चित्रपटगृहं बंद आहेत. त्यामुळे निर्माते संभ्रमात आहेत. दरम्यान महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी आता 50% क्षमतेने थिएटर्स खुले झाले आहेत. त्यामुळे निर्माते राज्यात चित्रपटगृह सुरू होण्याची वाट पाहत असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान चित्रपटाचे ओटीटी प्लॅटफॉर्म राइट्स खरेदी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. तब्बल 33 कोटींना हे राइट्स विकले गेले असल्याचं म्हटलं आहे. पण चित्रपटगृह खुली होण्यास ओणखी वेळ गेला तर चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अमिताभ यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट देखील OTT वर प्रदर्शित झाला होता. त्यामुळे हा चित्रपट त्यांचा दुसरा ओटीटी चित्रपट ठरेल.

देवमाणूस सध्या काय करतोय? फौजी वेशात नव्या भूमिकेसाठी सज्ज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

बिग बींचा चेहरे हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र हा चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान चित्रपटांच एकून बॉक्स ऑफिस कलेक्शन हे 25% कमाई ही एकट्या महाराष्ट्रातून होते. त्यामुळे कोणताही निर्माता महाराष्ट्र वगळण्याची रिस्क घेत नाही. पण राज्यात अद्यापही निर्बंध कायम असल्याने चेहरे चित्रपटाने हा धोका पत्करला आहे. याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बेल बॉटमनेही हाच फॉर्मूला वापरून चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित केला आहे.

HBD: ‘तेरे नाम’ फेम अभिनेत्री भूमिका चावलाला सोडावं लागलं बॉलिवूड

संबंधित बातम्या

दरम्यान झुंडसाठी हा धोका पत्करणं सोपं नाही. या चित्रपटाची कथा महाराष्ट्रातील कथेवर आधारीत आहे. फुटबॉल कोच विजय बारसे यांचा हा बायोपिक आहे. त्यामुळे केवळ 25% नाही तर त्याहून अधिक कमाई एकटा महाराष्ट्र करू शकतो. त्यामुळे निर्माते हा धोका पत्करायला तयार नाहीत. दरम्यान 20 कोटींमध्ये बनलेला हा चित्रपट आधीच 33 कोटींना विकला गेला आहे. त्यामुळे कमर्शियल रिस्क कमी झाली आहे. चित्रपटाचे निर्माते संदिप सिंग यांनी सांगितलं की, चेहरे चित्रपटाचा प्रतिसाद पाहून पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या