अभिनेत्री भूमिका चावलाचा (Bhumika Chawla) आज वाढदिवस. 21 ऑगस्ट 1978 ला दिल्लीत झाला होता. तिचे वडील सैन्यात कर्नल पदावर होते. दिल्लीतूनच शिक्षण पूर्ण कलेल्या भूमिकाला अभिनयात रस होता. त्यासाठी ती मुंबईला आली होती.
1998 मध्ये प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी कडून आपलं फोटोशूट केलं होतं. त्यानंतर तिने कमाल केली. तिला अनेक जाहीराती मिळाल्या. तर साउथ चित्रपटही मिळाले. जे सुपहीट ठरले होते.
यानंतर हिंदी फिल्म इंडस्ट्रीत सलमान खान सोबत (Salman Khan) ‘तेरे नाम’ (Tere Naam) चित्रपटात तिने काम केलं. त्यातील तिचा अबिनय, सुंदरता प्रेक्षाकंना फारच आवडली होती.
चित्रपट सुपरहीट ठरला होता. सलमान आणि भूमिकाची केमिस्ट्री आजही प्रेक्षकांना भावते. त्यामुळे तेव्हाच भूमिका आता बॉलिवू़मध्ये यशस्वी आणि सुपरहीट ठरणार असं मानलं जात होतं. मात्र तसं झालं नाही.
भूमिकाला अनेक चित्रपटही मिळाले. अभिषेक बच्चनसोबत ‘रन’. त्यानंतर ‘दिल ने जिसे अपना कहा’, ‘गांधी माई फादर’, ‘दिल जो भी कहे’, ‘सिलसिले’ या चित्रपटात तिने काम केलं होतं.
पण या सगळ्यात तिला पहिल्या चित्रपटाइतकी लोकप्रियता मिळाली नाही. त्यानंतर भूमिकाने पुन्हा साउथ चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. जिथे तिला प्रसिद्धी मिळाली.
2007 साली भूमिकाने बॉयफ्रेंड भरत ठाकुरशी विवाह केला. त्यांना एक मुलगा देखील आहे. ती साउथ चित्रपटांत सध्या काम करत आहे.