मुंबई 27 जून: (Star Pravah) स्टार प्रवाहावरील ‘मुलगी झाली हो’ (Mulagi Zali Ho) मालिका गेले अनेक दिवस अनेक कारणांनी चर्चेत राहिली आहे. या मालिकेचे चाहते तसे बरेच आहेत. या मालिकेसाठी फारच खास दिवस आहे. अनेक कॉन्ट्रोव्हर्सी, आरोप प्रत्यारोपांच्या सिलसिल्यानंतर या मालिकेने नुकताच 500 भागांचा (Mulagi Zali Ho marathi serial) टप्पा पूर्ण केला आहे. या मालिकेचं वेगळेपण म्हणजे मालिकेचा विषय आणि कलाकारांचा अभिनय. शौनक आणि साजिरी यांची प्रेमकथा सध्या चांगल्या वळणावर आहे. या मालिकेमध्ये दिव्या सुभाष, योगेश सोहनी, शर्वाणी पिल्ले, सविता मालपेकर अशी मोठी नावं आहेत. या मालिकेतील काही कलाकारांनी मालिकेच्या या यशस्वी कामगिरीनंतर आपापल्या सोहळा मीडियावरून प्रेक्षकांचे आभार मनात आनंद व्यक्त केला होता. आज या मालिकेच्या हिरोईनने या पार्टीचे काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्या पोस्टवर चाहते अख्ख्या टीमचं अभिनंदन करताना दिसत आहेत आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा सुद्धा देत आहेत. या मालिकेचा प्रवास तसं पाहिलं तर बऱ्याच नाट्याने भरलेला होता. मालिकेच्या एका महत्त्वाच्या वळणावर या मालिकेला एका मोठ्या वादाचा (Mulagi Zali Ho controversy) सुद्धा सामना करावा लागला. या वादामुळे मालिकेतून किरण माने (Kiran Mane) या अभिनेत्याची हाकालपट्टी तर झालीच वरून मालिकेच्या कलाकारांविरुद्ध किरण माने असा एक आरोप प्रत्यारोपाचं प्रकरण सुद्धा चालू झालं. किरण माने या मालिकेतील विलास पाटील यांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्यावर मालिकेच्या मेकर्सनी महिला कलाकारांशी केलेल्या अयोग्य वागणुकीमुळे बरेच आरोप झाले होते आणि त्यांना मालिकेतून कमी सुद्धा करण्यात आलं. त्यावर किरण माने यांनी आपली बाजू ठेवली आणि प्रकरण बरंच वाढलं.
असं असूनही मालिकेने काहीच दिवसांपूर्वी पाचशे भागांचा टप्पा पूर्ण करत एक आनंदाची बातमी प्रेक्षकांना दिली. हे ही वाचा- लेकीच्या वाढदिवसाला सिद्धार्थ तृप्ती एकत्र! दोन वर्षांनी शेअर केलाय बायकोबरोबरचा PHOTO या मालिकेच्या संपूर्ण टीमने या मोठ्या यशाबद्दल नुकतंच सेलिब्रेशन सुद्धा केलं. यावेळी मालिकेची सगळी कास्ट अँड क्र्यु उपस्थित होते आणि खूप धमाल करत आपलं यश सिलेब्रेट केलं. यावेळी सगळ्या टीमने मिळून केक कापला अँड कमाल डान्ससुद्धा केला.