JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / संस्कारी बाबुजींवर झाले बलात्काराचे आरोप; #MeToo मुळे आलोक नाथ बेरोजगार

संस्कारी बाबुजींवर झाले बलात्काराचे आरोप; #MeToo मुळे आलोक नाथ बेरोजगार

अभिनेत्री संध्या मृदूल, विनंता नंदा, नवनीत निशान आणि दीपिक अमिन यांनी आलोक नाथ यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 9 जुलै**:** आलोक नाथ (Alok Nath) हे बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेते म्हणून ओळखले जातात. रोमँटिक हिरो ते संस्कारी वडील अशा विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी आजवर साकारल्या आहेत. (Alok Nath bollywood movies) ‘गांधी’, ‘कयामत से कयामत तक’, ‘हम साथ साथ है’, ‘हम आप के है कौन’, ‘मैने प्यार किया’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांद्वारे जवळपास चार दशकं त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मात्र इतका अनुभव आणि प्रसिद्धी असताना देखील आलोक नाथ सध्या बेरोजगार आहेत. (MeToo accused Alok Nath in more trouble) गेल्या काही काळात त्यांच्यावर अनेक अभिनेत्री आणि महिला कलाकारांनी लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले. परिणामी सर्व आगामी प्रोजेक्ट्समधून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. VIDEO: क्रिकेटच नव्हे तर कुकिंगमध्येही मास्टर-ब्लास्टर; पाहा सचिनचा नवा अंदाज आलोक नाथ यांचा जन्म 1956 साली बिहारमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. परंतु त्यांनी अभिनयाऐवजी डॉक्टरी करावी अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती. परंतु कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन त्यांनी अभिनय क्षेत्रातच करिअर केलं. गांधी या चित्रपटातून त्यानी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. 1982 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्यांनी एक लहानशी भूमिका साकारली होती. परंतु यानंतर टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. अन् मालिकांमध्ये लोकप्रिय झाल्यामुळे पुढे त्यांना बिग बजेट चित्रपटांमध्ये काम करण्यासाची संधी मिळाली. मशाल, आप मुझे अच्छे लगने लगे, ना तुम जानो ना हम, मेरे यार की शादी है, दिल कितना नादान है, जीवन युद्ध यांसारख्या 100 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. यामध्ये त्यांनी साकारलेल्या संस्कारी वडिलांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यामुळे संस्कारी बापुजी असंच त्यांना पुढे म्हटलं जाऊ लागलं. Hot मलायकाचा Monochrome अवतार; 25 वर्षांपूर्वी या फोटोंनी उडवली होती खळबळ परंतु दोन वर्षांपूर्वी त्यांच्या या सोज्वळ भूमिकेला तडा गेला. कारण अभिनेत्री संध्या मृदूल, विनंता नंदा, नवनीत निशान आणि दीपिक अमिन यांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. या प्रकरणी त्यांनी आलोक नाथांना कोर्टात देखील खेचलं होतं. या प्रकरणामुळे आलोक नाथांवर तुफान टीका झाली. दरम्यान काही बॅकस्टेज महिला कलाकारांनी देखील त्यांचे आश्चर्य चकित अनुभव सांगितले. परिणामी आलोक नाथ यांना निर्मात्यांनी प्रोजेक्टमधून बाहेर काढण्यास सुरुवात केली. अन् सध्या ते बेरोजगार होऊन आपल्या घरात बसले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या