JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मनू-अनिकेतला वेगळं करण्याचं समरने दिलं चॅलेंज, 'पाहिले नं मी तुला'मध्ये नवं वळण

मनू-अनिकेतला वेगळं करण्याचं समरने दिलं चॅलेंज, 'पाहिले नं मी तुला'मध्ये नवं वळण

‘पाहिले नं मी तुला’(pahile Na Mi Tula) मालिकेत मनू आणि अनिकेतला वेगळं करण्यासाठी बाबांनी घेतली समरची मदत.

जाहिरात

pahile na mi tula

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 मे: ‘पाहिले नं मी तुला’(Pahile Na Mi Tula) मालिकेत दररोज नवनवीन ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या मालिकेबद्दल प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागलेली असते. मनू (Manu) आणि अनिकेतला (Aniket) वेगळं करण्यासाठी समर (Samar) रोज नवा खेळ खेळत असतो. नव्या प्रोमोमुळे समर आपल्या खेळामध्ये खरच यशस्वी होणार का? मनू आणि अनिकेत खरचं वेगळे होणार का?  याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे. झी मराठीवरील ‘पाहिले नं मी तुला’ मालिका चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. अगदी कमी वेळेत या मालिकेने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मनू आणि अनिकेतची लव्हस्टोरी आणि समरच्या खुरापती डोक्यामुळे त्यांना येणारी संकटे चाहत्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात.

संबंधित बातम्या

या मालिकेचा नुकताच एक नवा प्रोमो रिलीज झाला आहे. त्यामध्ये अनिकेत आणि मनू समरला त्याच्या केबिनमध्ये जाऊन भेटतात. यावेळी समर त्यांना सांगतो की, मनूच्या बाबांना मी तुम्हा दोघांना वेगळं करण्याचं वचन दिलंय. आणि कोणत्याही परीस्थित मी ते पूर्ण करणारच. यावर अनिकेत सुद्धा भडकतो आणि समरला आवाहन करतो. की काही झालं तरी मनू आणि मी वेगळं होणार नाही. तुला हवं ते कर, आणि समरला आमच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करू नकोस असं देखील बजावतो. सतेच त्याने दिलेले घटस्फोटाचे पेपरसुद्धा फाडून टाकतो. (हे वाचा: मराठी मालिका ते बॉलिवूड चित्रपट, असा आहे ‘आई कुठे काय करते’ फेम अंकिताचा प्रवास   ) असा हा नवीन प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण समर आपल्या खुरापती डोक्याने वाटेल ते करतो. त्यामुळे मनू आणि अनिकेत कशा पद्धतीने त्याला तोंड देणार आणि कसं आपलं नातं टिकवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (हे वाचा: मराठमोळ्या सई लोकूरचा साउथ इंडियन तडका, डान्सचा धम्माल VIDEO VIRAL   ) मनू आणि अनिकेतने काही दिवसांपूर्वी गुपचूप लग्न केल होतं. मात्र मनूच्या वडिलांना हे समजल्या नंतर त्यांनी मनूला घराबाहेर काढलं आहे. आणि आता मनू अनिकेत त्याच्या घरी नवरा बायको म्हणून राहत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या