'आई कुठे काय करते' मधील 'अंकिता' फेम अभिनेत्री राधा सागर आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'अंकिता' हा थोडासा नेगेटिव्ह रोल असला, तरी त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. अस्मिता म्हणजेच राधाचे अनेक चाहते आहेत. राधाचा जन्म 27 मे 1989 मध्ये पुण्यामध्ये झाला आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राधाने मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली होती. राधाने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केल आहे. अस्मिता, कन्यादान,लक्ष्य, एक मोहोर अबोल,जयस्तुते, आवाज यांसारख्या मालिकेत ती झळकली होती. मालिकांबरोबर राधाने मराठी चित्रपटही केले आहेत. नाती खेळ, एक अलबेला, वजनदार, कंडीशन अप्लाय, फूल , विकून टाक या चित्रपटात तिने अभिनय केला आहे. मराठी मालिका आणि चित्रपटां व्यतिरिक्त राधाने हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं आहे. अलीकडेच ती संजय लीला भन्साळी यांच्या 'मलाल' या चित्रपटात झळकली होती. राधाने सागर कुलकर्णीशी लग्न केलं आहे. राधा सोशल मीडियावर सुद्धा सक्रीय असते. ती सतत आपले हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेयर करत असते. राधा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.