JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / उफफ्! वैभवचा शायराना अंदाज; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

उफफ्! वैभवचा शायराना अंदाज; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

मराठीतील चॉकलेट बॉय वैभव तत्ववादी आपल्या अभिनयाने नेहमीचं सर्वांचं लक्ष वेधून घेतो

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जून- अभिनेता (Actor) वैभव तत्ववादी(Vaibhav Tatwawadi) नेहमीचं आपल्या खास अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. तो एक उत्तम अभिनेता, एक उत्तम डान्सर तर आहेच पण तो एक उत्तम शायरसुद्धा आहे हे आज समजलं. वैभवने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ (Viral Video) शेयर केला आहे. त्यामध्ये तो एक सुंदर शायरी म्हणताना दिसत आहे. पाहूया वैभवचा शायराना अंदाज.

संबंधित बातम्या

मराठीतील चॉकलेट बॉय वैभव तत्ववादी आपल्या अभिनयाने नेहमीचं सर्वांचं लक्ष वेधून घेतो. तो सोशल मीडियावर सुद्धा बराच सक्रीय असतो. सतत आपल्या बिविध पोस्ट शेयर करून चाहत्यांच्या संपर्कात असतो. वैभवने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये तो एक सुंदर शायरी म्हणत असल्याचं दिसत आहे. ‘हुस्न को बे-हिजाब होना था, शौक़ को कामयाब होना था, कुछ तुम्हारी निगाह काफ़िर थी, कुछ मुझे भी ख़राब होना था’शायर मजाज़ लखनवी यांची ही शायरी आहे. (हे वाचा:  तारक मेहता…फेम बबिताला सुप्रीम कोर्टाचा दिलासा; वाचा काय होतं नेमकं प्रकरण   ) वैभवच्या या अंदाजावर चाहते फिदा झाले आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांच्या अनेक कमेंट्स येत आहेत. तितकेच लाईकसुद्धा मिळत आहेत. कमेंट करत कोण वैभवच्या शायरी म्हणण्याच्या अंदाजाचं कौतुक करत आहे, तर कोणी त्याच्या डोळ्यातील दिसणाऱ्या त्या भावांचं. अनेकांनी कमेंट करून म्हटलं आहे ‘वैभव तुझ्यामुळे आमची सकाळ गोड झाली’. तर एकंदरीतचं वैभवला भरपूर प्रेम मिळत आहे. (हे वाचा:  Hot शालूचा Bold डान्स; राजेश्वरीच्या videoला काही तासांत मिळाले लाखो व्ह्यूज ) वैभव हा मराठीतील एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने मराठीतील फक्त लढ म्हणा, सूर्या, कॉफी आणि बरचं काही, मि एन्ड मिसेस सदाचारी, भेटली तू पुन्हा अशा अनेक चित्रपटांत काम केलं आहे. इतकच नव्हे तर वैभवने बॉलिवूडमध्ये सुद्धा काम केलं आहे. संजय लीला भंसाळी यांच्या सुपरहिट ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. यामध्ये वैभवने रणवीरच्या लहान भावाची भूमिका साकारली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या