Hot शालूचा Bold डान्स; राजेश्वरीच्या videoला काही तासांत मिळाले लाखो व्ह्यूज

फँड्री चित्रपटातील शालूच्या बोल्ड डान्सवर होतोय कौतुकाचा वर्षाव; तिला बॉलिवूड चित्रपटात घ्या अशी केली जातेय मागणी

फँड्री चित्रपटातील शालूच्या बोल्ड डान्सवर होतोय कौतुकाचा वर्षाव; तिला बॉलिवूड चित्रपटात घ्या अशी केली जातेय मागणी

  • Share this:
    मुंबई 18 जून: नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या फँड्री (Fandry) चित्रपटातून नावारुपास आलेली राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) आज मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिनं या चित्रपटात साकारलेली शालू ही व्यक्तिरेखा तुफान गाजली होती. आजही कित्येक चाहते तिला तिच्या खऱ्या नावाऐवजी शालू अशीच हाक मारतात. रुपेरी पडद्यावर एका साध्या सरळ मुलीच्या रुपात झळकलेली शालू खऱ्या आयुष्यात मात्र तितकीच ग्लॅमरस आहे. (Rajeshwari Kharat Bold Photo) ती सोशल मीडियावर आपले बोल्ड आणि बिनधास्त फोटो शेअर करताना दिसते. यावेळी तिनं एक बोल्ड डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील दंग व्हाल. राम गोपाल वर्मा फिटनेस कोच? पाहा अभिनेत्रीसोबत करतायेत Hot वर्कआऊट या व्हिडीओंमध्ये राजेश्वरी पंजाबी आणि हिंदी गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. यामध्ये ती गाण्याच्या तालावर ठेका धरताना दिसत आहे. तिने मारलेले ठुमके पाहून चाहते देखील अवाक झाले आहेत. ती ‘आँखोमे बसे हो तूम’ या बॉलिवूड गाण्यावर डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे. हावभाव कसे असावेत, ठेका कसा धरावा हे समजत नसल्यामुळे ती सुरुवातीला थोडी गोंधळलीसुद्धा. मात्र नंतर पुन्हा एकदा राजेश्वरी मजेदार डान्स करताना दिसतेय. ‘मला Coronavirus चिडवतात’; बॉलिवूड अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक अनुभव राजेश्वरीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. राजेश्वरीने तिच्या फेसबूक अकाऊंटवर दोन व्हिडीओ अपलोड केले आहेत. या दोन्ही व्हिडीओंना हजारो लाईक्स मिळाले आहेत. तर तिच्या शेकडो चाहत्यांनी तिच्या डान्सवर उत्स्फूर्तपणे कमेंट्स केल्या आहेत.
    Published by:Mandar Gurav
    First published: