जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / तारक मेहता...फेम बबिताला सुप्रीम कोर्टाचा दिलासा; वाचा काय होतं नेमकं प्रकरण

तारक मेहता...फेम बबिताला सुप्रीम कोर्टाचा दिलासा; वाचा काय होतं नेमकं प्रकरण

तारक मेहता...फेम बबिताला सुप्रीम कोर्टाचा दिलासा; वाचा काय होतं नेमकं प्रकरण

मुनमुन दत्ता सब टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत बबिता अय्यरची भूमिका साकारते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 जून- ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Tarak Mehata Ka Oolta Chashma)  मधील बबिता अर्थातच अभिनेत्री मुनमुन दत्तावर(Munmun Datta), काही दिवसांपूर्वी जातीयवादी शब्दाचा वापर केल्याच्या आरोपातून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे ती संकटात सापडली होती. मात्र आत्ता सुप्रीम कोर्टाकडून मुनमुनला दिलासा मिळाला असल्याचं समजलं आहे. काही दिवसांपूर्वी मुनमुन दत्ताने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेयर केला होता. आणि त्यामध्ये तिने एका विशिष्ट जातीबद्दल एक शब्द वापरला होता. हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आणि त्यामुळे लोक मुनमुनवर नाराज झाले होते. बऱ्याच लोकांनी मुनमुनच्या अटकेची देखील मागणी केली होती. (हे वाचा:  ‘शाहरुखनं दिले होते 300 रुपये’; ‘फॅमेली मॅन’च्या बायकोनं सांगितला किस्सा   ) तसेच हरियाणाच्या हंसी येथे मुनमुनवर एफआयआर दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे ती चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मात्र नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार मुनमुन दत्ताला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने मुनमुनविरुद्धची ही केस थांबवली आहे. ही केस बंद झाल्यामुळे मुनमुनला मोठा दिलासा मिळाला आहे. (हे वाचा:. अक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL   ) या प्रकरणानंतर मुनमुनने सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत माफी मागितली होती. तिनं म्हटलं होतं, ‘माझा हेतू कोणालाही त्रास देण्याचा किंवा कोणच्याही भावनांचा अपमान करण्याचा मुळीचं नव्हता. माझ्याकडे शब्दांचं ज्ञान कमी आहे. मला त्या शब्दाचा नेमका अर्थ माहिती नव्हता त्यामुळे मी नकळत तो वापरला. मात्र मला आत्ता त्याचा अर्थ समजला आणि मी तो भाग काढूनही टाकला’ असं तिनं म्हटलं होतं. मुनमुन दत्ता सब टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत बबिता अय्यरची भूमिका साकारते. तिचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. आणि त्यामुळेच तिने एका विशिष्ट जातीबद्दल शब्दप्रयोग केल्यामुळे लोक नाराज झाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात