JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शिवानी बावकर चाहत्यांकडे मागतेय आर्थिक मदत; हवं आहे 16 कोटींचं इंजेक्शन

शिवानी बावकर चाहत्यांकडे मागतेय आर्थिक मदत; हवं आहे 16 कोटींचं इंजेक्शन

युवान( Yuvan) हा अवघ्या 15 महिन्यांचा छोटासा मुलगा आहे. त्याला ‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोपी’ या दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे. त्याच्या उपचारासाठी तब्बल 16 कोटीच्या एका इंजेक्शनची गरज आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 मे-  युवान( Yuvan) हा अवघ्या 15 महिन्यांचा छोटासा मुलगा आहे. त्याला ‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोपी’ या दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे. त्याच्या उपचारासाठी तब्बल 16 कोटीच्या एका इंजेक्शनची गरज आहे. त्यासाठी त्याला मदतीची अत्यंत गरज आहे. त्या चिमुकल्या जीवाची व्यथा समाजा समोर मांडण्यासाठी ‘लागीर झालं जी’ (Lagir Zal Ji) फेम शीतली (Sheetali), म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकरने (Shivani Baokar)  पुढाकार घेतला आहे. शिवानीने आपल्या सोशल मीडियावरून व्हिडीओ पोस्ट (instagram Video) करत मदतीसाठी आवाहन केलं आहे.

संबंधित बातम्या

अभिनेत्री शिवानी बावकरने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये तिनं सांगितलं आहे. युवान हा रुपाली आणि अमित रामटेककर यांचा मुलगा आहे. तो केवळ 15 महिन्यांचा आहे. त्याला ‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोपी’ हा दुर्मिळ आजार जडला आहे. त्यामुळे त्याच्या उपचारासाठी एका इंजेक्शनची गरज आहे. तो इंजेक्शन अमेरिकेहून मागवावा लागणार आहे. आणि त्यासाठी तब्बल 16 कोटी लागणार आहेत. (हे वाचा: ‘लक्ष्या’च्या आठवणीत सचिन पिळगांवकर झाले भावुक; Photo शेअर म्हणाले… ) इंजेक्शनसाठी इतकी रक्कम त्यांना खर्च करणं शक्य नाहीय. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींची त्यांना गरज आहे. या एका छोट्याश्या जीवाला जीवदान देण्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. आहे म्हणूनचं शिवानीने ‘क्राऊड फंड’ मध्ये सहभाग घेतला आहे. आणि इतरांना सुद्धा तिनं यासाठी आवाहन केल आहे. (हे वाचा: कोरोनापासून दूर राहण्यासाठी करा असा व्यायाम; पाहा भूषण प्रधानच्या Fitness Tips   ) काही महिन्यांपूर्वी असंच आवाहन अभिनेता आणि खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा केलं होतं. त्यांनी युवानच्या मदतीसाठी समाजातील विविध घटकांना एकत्र येण्याचंआवाहन केलं होतं. तसेच त्यांनी हेसुद्धा म्हटलं होतं,की युवानच्या भेटीनंतर मी लोकसभेमध्ये दुर्मिळ आजारांनी ग्रस्त लोकांचा मुद्दा सुद्धा मांडला होता. त्यात मी त्यांच्या मदतीसाठी अर्थसंकल्पात खास तरतूदही करण्याचं आवाहन देखील केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या