मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कोरोनापासून दूर राहण्यासाठी करा असा व्यायाम; पाहा भूषण प्रधानच्या Fitness Tips

कोरोनापासून दूर राहण्यासाठी करा असा व्यायाम; पाहा भूषण प्रधानच्या Fitness Tips

भूषण सध्या आपल्या फिटनेससाठी तासंतास व्यायाम करून घाम गाळत आहे. त्याच्या एक्सरसाईजचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.

भूषण सध्या आपल्या फिटनेससाठी तासंतास व्यायाम करून घाम गाळत आहे. त्याच्या एक्सरसाईजचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.

भूषण सध्या आपल्या फिटनेससाठी तासंतास व्यायाम करून घाम गाळत आहे. त्याच्या एक्सरसाईजचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 21 मे-   कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला (Corona Second Wave) आवर घालण्यासाठी महाराष्ट्रात (Maharashtra)  पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown)  करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व लोक आपआपल्या घरीच आहेत. मात्र या काळात आपल्या आरोग्यावर लक्ष देणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे अनेक कलाकार आपल्या फिटनेसकडे (Fitness) आवर्जून लक्ष देत आहेत. मराठी अभिनेता (Marathi Actor)  भूषण प्रधानचा (Bhushan Pradhan) सुद्धा यात समावेश आहे. भूषण सध्या आपल्या फिटनेससाठी तासंतास व्यायाम करून घाम गाळत आहे. त्याच्या एक्सरसाईजचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.

मराठीतील उत्तम अभिनेता समजला जाणारा भूषण प्रधान सध्या चांगलाच चर्चेत आहे. भूषण लॉकडाऊनचा पुरेपूर वापर करून घेताना दिसत आहे. भूषण आपल्या मोकळ्या वेळेचा वापर आपल्या फिटनेससाठी करत आहे. तो अतिशय हार्ड अशी एक्सरसाईज करत आहे. तासंतास स्वतःला एक्सरसाईजमध्ये व्यग्र ठेवत आहे.

(हे वाचा:निक्की तांबोळीने पुन्हा वाढवलं सोशल मीडियाचं तापमान, पाहा PHOTO  )

भूषण आपल्या एक्सरसाईजचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करत असतो. त्याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होताना दिसत आहेत. यामध्ये भूषण विविध प्रकारच्या एक्सरसाईज करताना दिसून येतो. व्हिडीओ पाहूनचं तो यासाठी किती मेहनत घेत आहे हे दिसतं.  भूषणच्या या कष्टाचं फळ सुद्धा अगदी स्पष्ट दिसून येत आहे. भूषणची बॉडी आधीपेक्षा सुद्धा छान दिसत आहे. भूषणचं शरीर अगदी पिळदार झालं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

(हे वाचा:अनुराग कश्यपची मुलगी पडली प्रेमात; सांगितला आयुष्यातील पहिल्या Kiss चा अनुभव )

भूषणच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केल आहे. आम्ही दोघी, कॉफी आणि बरचं काही, टाईमपास, टाईमपास 2, सतरंगी रे अशा अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये त्यानं अभिनय केला आहे. चित्रपटासोबतचं त्याने रंगमंच आणि वेबसिरीजमध्ये सुद्धा काम केलं आहे. त्याचबरोबर 2019 मध्ये त्याला ‘Maharashtra’s Most Desirabel Man’ हा किताब सुद्धा देण्यात आला होता. भूषणच्या या फिटनेस व्हिडीओनं सध्या अनेक तरुणांना भुरळ घातली आहे.

First published:

Tags: Fitness, Marathi entertainment