JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Big Boss OTT: 'परम सुंदरी' मलायका बिग बॉसच्या घरात लावणार सुपरहॉट डान्सचा तडका, प्रेक्षकांची उत्कंठा वाढली

Big Boss OTT: 'परम सुंदरी' मलायका बिग बॉसच्या घरात लावणार सुपरहॉट डान्सचा तडका, प्रेक्षकांची उत्कंठा वाढली

बिग बॉसच्या प्रीमियर नाइटला अभिनेत्री मलायका अरोराचा (Malaika Arora) सुपरहॉट डान्स पाहायला मिळणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 8 ऑगस्ट : ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) आज रात्री 8 वाजल्यापासून सुरू होत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म वूटवर (Voot app) हा शो पाहिला जाणार आहे. त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आज सकाळपासून सोशल मीडियावर हा शोचीच चर्चा पाहायला मिळत आहे. करण जोहर (Karan Johar) या शोला होस्ट करत आहे. तर यावेळी बिग बॉसमध्ये हॉटनेस आणि ग्लॅमरचा तडका लागणार आहे हे करणने प्रोमोतच सांगितलं होतं. तर याची पहिली झलक पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या प्रीमियर नाइटला अभिनेत्री मलायका अरोराचा (Malaika Arora) सुपरहॉट डान्स पाहायला मिळणार आहे. मलायका ‘परम सुंदरी’ (Param Sundari) या सुपरहीट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. याचा प्रोमो नुकताच वूट अँपवर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणखीनच वाढत आहे. आपल्या अदांनी मलायकाने शोला चार चाँद लावल्याचं पाहायला मिळत आहे. सुंदर गोल्डन साडीत ती नृत्य करताना दिसत आहे.

Big Boss OTT: कार्निव्हल थीमने सजलं बिग बॉसचं घर; पाहा INSIDE PHOTOS

याशिवाय नुकतेच बिग बॉसच्या घराचे आतील फोटो समोर आले होते. यावेळी अतिशय सुंदर आणि आगळं वेगळं असं घर सजवण्यात आलं आहे. कर बोहेमियान आणि कार्निव्हल थीममध्ये ते सजवण्यात आलं आहे. घरात लहानसा स्विमिंगपूल ते गार्डन सगळंकाही आहे.

दरम्यान अनेक टीव्ही कलाकार यावेळी दिसणार आहेत. तसेच अनेक ग्लॅमरस अभिनेत्री देखील दिसणार आहेत. त्यामुळे सुरूवातीपासूनच सगळं काही ग्लॅमरस पाहायला मिळत आहे. तेव्हा आता करण जोहर शोमध्ये आणखी काय जादू करणार हे पाहणं देखील ओत्सुक्याचं ठरेलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या