JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Dattu More Love Story : 'पहाटे 4.30 वाजेपर्यंत व्हिडीओ कॉलवर बोलायचे'; दत्तू मोरेची हटके लव्हस्टोरी

Dattu More Love Story : 'पहाटे 4.30 वाजेपर्यंत व्हिडीओ कॉलवर बोलायचे'; दत्तू मोरेची हटके लव्हस्टोरी

त्तू मोरेला त्याच्या स्वप्नातील राजकुमारी भेटली तरी कुठे? दत्तू मोरेची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरू झाली हे गुपीत आता समोर आलं आहे.

जाहिरात

दत्तू मोरे लव्ह स्टोरी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 जून :  महाराष्ट्राची हास्यजत्र फेम अभिनेता दत्तू मोरे नं नुकतंच लग्न करून त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. दत्तूनं गर्लफ्रेंड स्वाती घुनागेबरोबर लग्नगाठ बांधली. आधी प्रीवेडींग फोटो शेअर नंतर थेट लग्नाचे फोटो दत्तूनं शेअर केलेत. पुण्यात डॉक्टर असलेल्या स्वाती घुनागेबरोबर लग्न करून दत्तूनं त्याचा संसार थाटला आहे. स्वाती ही स्त्रीरोग तज्ञ असून पुण्यात तिचं स्वत: क्लिनिक आहे. दत्तूनं आजवर कधीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यबद्दल भाष्य केलं नव्हतं त्यामुळेच त्याच्या अचानक लग्नानं सगळेच शॉक झाले. बरं लग्न तर झालं. पण दत्तू मोरेला त्याच्या स्वप्नातील राजकुमारी भेटली तरी कुठे? दत्तू मोरेची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरू झाली  हे गुपीत आता समोर आलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत दत्तूनं त्याची लव्हस्टोरी चाहत्यांसमोर आणली आहे. लव्ह स्टोरी सांगत दत्तू म्हणाला, “आमच्यासाठीही हे कसं कुठे कधी झालं हे कळलं नाही. आम्ही 4-5 वर्षांपूर्वी एका कॉमन मित्राच्या मार्फत भेटलो होतो. पुण्यात आम्ही भेटलो होतो. तेव्हा आमची फार कॅज्युअल ओळख झाली होती.  त्यानंतर आम्ही फेसबुकवर कनेक्ट झालो. 2 वर्ष आम्ही फक्त फेसबुक फ्रेंड होतो. आमच्यात काही बोलणं होत नव्हतं. तिने मला महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये पाहिलं. त्यानिमित्तानं तिनं मला मेसेज केला. आमचं बोलणं सुरू झालं. त्याआधी आम्ही फार कधीतरी गुड मॉर्निंग, गुड नाईट असे मेसेज करायचो एकमेकांना. नंतर आमचं आमचं बोलणं वाढू लागलं”. हेही वाचा -  दत्तू मोरेच्या चाळीला त्याचंच नाव का दिलं, काय आहे अभिनेत्याच्या घराच्या नावाची गोष्ट दत्तू पुढे म्हणाला, “आम्ही बोलायला लागलो तेव्हा स्वातीचं नुकतंच MS पूर्ण झालं होतं. तिची अप्रेंन्डरशिप सुरू होती.  तिच्या कामाचा व्याप वाढला होता. ती सतत कामात बिझी होती.  त्यादरम्यान इकडे महाराष्ट्राची हास्यजत्रा सुरू झालं होतं मी पण शुटींगमध्ये बिझी होतो. त्या काळात आम्ही कसे कनेक्ट झालो हे आम्हालाही कळलं नाही. तो ग्राफ आमच्याही लक्षात येत नाहीये. आम्ही कसे काय आणि का कनेक्ट झालो हा प्रश्न आजही आम्हाला पडला आहे. पण हे सगळं आपोआप घडत गेलो आणि आम्ही एकत्र येत गेलो”. दत्तूविषयी बोलताना स्वाती म्हणाली,  “ते फार कामात असतात. त्यांचा तो स्वभाव मला खूप आवडला होता. एक संसारी माणूस कसा असतो तसे ते आहेत. मी आणि माझं काम बरं असं त्यांचं असतं. आम्ही जेव्हा बोलायला लागलो तेव्हाही सुरूवातीला कामाच्या गप्पा व्हायच्या. मग नंतर थोडं एकमेकांच्या आवडी-निवडी शेअर करू लागलो. सुरूवातीला आम्ही बोलायला लागलो तेव्हा मला कळलं होतं की हे कामात खूप फोकस आहे. त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करू नये म्हणून मी माझ्या मनातील भावना त्यांना सांगितल्या नाहीत”.

यावर दत्तू म्हणाला, “तिला मी आवडायचो पण ती मला सांगत नव्हती. ती मेसेज करायची आणि  डिलीट करायची. एक दोन वेळा मी तिला पकडलं.  मग मला थोडासा अंदाज आला. त्या काळात ही कामातून थकून रात्री उशिरा घरी यायची.  मग रात्री अचानक एकाच वेळी मेसेजवर तिचा हाय यायचा माझाही हाय यायचा. मग आम्ही बोलायला लागलो.  रात्री थकून घरी आल्यानंतर एकमेकांबरोबर गप्पा मारल्या बरं वाटायचं आणि दोघांना या फिलिंग जाणवल्या.  थोड्या दिवसांनी आमचं बोलणं इतकं वाढलं की बोलण्याच्या ओघात आम्ही पहाटे 4.30 वाजेपर्यंत व्हिडीओ कॉलवर बोलायचो. तेव्हा हे खूप वेगळं वाटायचं. 4.30 नंतर मी झोपून जायचो. पण ही 6.30 ला उठून कामाला जायची. तरी दुसऱ्या पुन्हा रात्री आम्ही बोलायचो.  8 दिवसांनी आम्ही व्हिडीओ कॉलवर बोलायचो. एकमेकांशी बोलल्यानंतर आम्ही फ्रेश व्हायचो”.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या