'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम या विनोदी कार्यक्रमातून दत्तू मोरे लोकांच्या मनावर राज्य करत आहे. दत्तू मोरेला नेहमीच सर्वांनी मजेशीर अंदाजात पाहिलं आहे. पण दत्तू हा इतका रोमँटिकसुद्धा आहे, हे चाहत्यांनी पहिल्यांदाच पाहिलं. दत्तू मोरे नुकतंच लग्नबंधनात अडकला आहे. त्याने सुरुवातीला आपल्या प्री वेडिंगचे रोमँटिक फोटो शेअर केले होते. यामध्ये दत्तू आपल्या पत्नीसोबत अगदी रोमँटिक अंदाजात दिसून आला होता. दरम्यान आता दत्तू मोरेच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. दत्तूने अगदी पारपंरिक मराठमोळ्या पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे.