मुंबई, 23 मे- सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमावर प्रेक्षक अगदी भरभरुन प्रेम करतात. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने आज प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आपल्या भन्नाट विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची ताकद या कार्यक्रमामध्ये आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे कार्यक्रमामधील काही विनोदवीरांचं तर नशिबच बदललं. त्यातीलच एक विनोदवीर म्हणजे दत्ता मोरे म्हणजेच सगळ्यांचा लाडका दत्तू मोरे होय. प्रत्येकाचं एक हक्काचं घर असावं असं स्वप्न असतं आणि दत्तूचे देखील तसचं काहीसं स्वप्न आहे. दत्तूचं हक्काचं घर चाळीत आहे. विशेष म्हणजे त्याच्या या चाळीला त्याचचं नाव दत्तू चाळ असं देण्यात आलं आहे. याला देखील एक खास कारण आहे. दत्तूने एका मुलाखतीमध्ये याचे कारण सांगितलं होतं. याबद्दलच आपण जाणून घेणार आहे. वाचा- ‘अनुपमा’ फेम गौरव खन्नाने पत्नीला दिलं इतकं महागडं गिफ्ट; होतंय सर्वत्र कौतुक वागळे इस्टेट रामनगर परिसरातील चाळीत राहतो दत्तू दत्तू हा ठाण्यामधील वागळे इस्टेट रामनगर परिसरातील चाळीत लहानाचा मोठा झाला. अजूनही तो त्याच चाळीत राहतो. त्याच्या या यशाबद्दल त्याच्या चाळकाऱ्यांना प्रचंड अभिमान आहे. म्हणून त्यांनी दत्तू साठी एक खास भेट दिली आहे. ती म्हणजे दत्तू ज्या चाळीत राहतो त्या चाळीला ‘दत्तू चाळ’ असे नाव देण्यात आले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दत्तूने हे याबद्दल सांगितलं होतं. एका कलाकारासाठी याहून मोठी भेट काहीचं असू शकतं नाही. घर लहान असो की मोठं शेवटी ते आपल्या हक्काचं असतं आणि आपल्या स्वप्नाचं साक्षीदार असतं. याच चाळीत तो मोठा झाला आणि आज याच नावनं ही चाळ ओळखली जाते, हे खरचं अभिमानास्पद असंच आहे.
चाळीला नव्हत नाव दत्तू या मुलाखतीत म्हणाला होता की, ‘मी राहत असलेल्या चाळीला याआधी कोणतंच नाव नव्हतं. चाळ कुठे आहे हे सांगायचं झालं तर आजूबाजूला असलेल्या एखाद्या ठिकाणावरुन ते सांगावं लागायचं. पण आता हिच चाळ माझ्या नावाने ओळखली जाते. हे सगळंच माझ्यासाठी खूप आनंद देणारं आहे.’ असं दत्तू म्हणाला. यासाठी त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमचे आभार देखील मानले होते.
या कारणासाठी दिलं दत्तूचं नाव दत्तू करत असलेलं काम याचा या चाळकऱ्यांना खूप अभिमान वाटतो, म्हणूनच त्याच्या चाळीतील मंडळींनी याला दत्तूची चाळ असं नाव दिल आणि आज ही चाळ याचं नावानं ओळखू लागली आहे. सध्या दत्तू आणखी एका कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यानं नुकतचं लग्न केलं आहे. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.