Mahabharat Movie
मुंबई, 14 सप्टेंबर : बॉलिवूडमध्ये सध्या ऐतिहासिक सिनेमे बनवायचा ट्रेंड आला आहे. आतापर्यंत फक्त एका चौकटीतील सिनेमे बनवणारे बॉलिवूडचे दिग्दर्शक, निर्माते आता नवे ऐतिहासिक विषय हाताळू लागले आहेत. रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असताना आता अजून एका नव्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. आता बॉलिवूडमध्ये महाभारतावर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार आहे. बॉलीवूडचे काही निर्माते एकत्रितपणे महाभारतावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच या चित्रपटामध्ये बॉलिवूडच्या बड्या स्टार्सची वर्णी लागल्याचं देखील समजत आहे. महाभारत’ या विषयावर आतापर्यंत अनेक मालिका प्रदर्शित झाल्या आहेत. सर्वात पहिल्यांदा बी.आर. चोप्रा टीव्हीवर घेऊन आले होते. ते लोकप्रिय झालं होतं. आता दिग्दर्शक फिरोज नादियाडवाला यावर सिनेमा करण्यासाठी सज्ज झालेत. ते महाभारत’ चित्रपट साकारण्याचे शिवधनुष्य पेलणार आहेत. या चित्रपटामध्ये बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी दिसणार आहेत. या चित्रपटाचे बजेट तब्ब्ल 700 कोटी असून हा ५D चित्रपट असेल अशी माहिती समोर येत आहे. आता यात कोणकोणते कलाकार झळकणार याविषयीची चर्चा आता सोशल मीडियावर सुरु झाली आहे. हेही वाचा - Adipurush Teaser : या दिवशी रिलीज होणार ‘आदिपुरुष’चा जबरदस्त टीझर; राम अवतारात प्रभास जिंकणार प्रेक्षकांचं मन या सिनेमात बाॅलिवूडचे अनेक कलाकार दिसतील. सिनेमात अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग, परेश रावल, नाना पाटेकर, अनिल कपूर हे कलाकार तर नक्कीच असणार आहेत. स्त्री भूमिका कोण नायिका करणार, हेही अजून गुलदस्त्यात आहे. अजून पूर्ण माहिती कळली नाही. ती काही दिवसांनी समोर येईल. पण या कलाकारांची नावे ऐकूनच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ‘बॉलिवूड हंगामा’नुसार, फिरोज नाडियादवाला यांनी ‘महाभारत’वर काम सुरू केले आहे. गेल्या 4-5 वर्षांपासून या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. पण निर्मात्यांना त्याच्या प्री-प्रॉडक्शनमध्ये आणखी काही वर्षे लागतील. अशा परिस्थितीत हा चित्रपट 2025 मध्ये तयार होईल आणि डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित होईल. तसाच हा चित्रपट हिंदी भाषेत बनत असला तरी अनेक भाषणामध्ये डब होणार आहे.
एवढ्या बड्या कलाकरांना एकत्र घेऊन सिनेमा करणं ही बॉलिवूडची नवीन गोष्ट नाही. पण हे एक मोठं काम नक्कीच आहे. रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ चित्रपटाची प्रदर्शनाआधीच चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळे ‘महाभारत’ सिनेमाविषयी अजून माहिती जाणून घ्यायला चाहते उत्सुक झालेत.