JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / HBD : बॉलिवूडची पहिली Bikini Girl; पाहा बेधडक नुतन यांचा थक्क करणार प्रवास

HBD : बॉलिवूडची पहिली Bikini Girl; पाहा बेधडक नुतन यांचा थक्क करणार प्रवास

सौंदर्यवती, बिनधास्त अभिनेत्री नुतन यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 4 जून : हिंदी सिनेसृष्टीत एकेकाळी अतिशय लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री नुतन (Nutan) यांचा आज जन्मदिवस. 60 ते 70 च्या दशकात त्यांनी अनेक सुपरहीट चित्रपट दिले. 1950 त्यांनी हमारी बेटी या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. तेव्हा त्या फक्त 14 वर्षांच्या होत्या. नुतन यांचा जन्म मुंबईत एका फिल्मी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात 4 जून 1936 ला झाला होता. नुतन यांची आई शोभना समर्थ देखिल एक अभिनेत्री होत्या. तर वडील कुमारसेन समर्थ एक दिग्दर्शक होते. घरात दिवसरात्र चित्रपटांशी निगडीत चर्चा व्हायच्या. हे सगळं लहान नुतन ऐकायची. आणि त्यामुळे नुतन यांच्यात अभिनयाची आवड निर्माण झाली.

नुतन यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यांच करिअर अगदी य़शाच्या शिखरावर असतानाचं त्यांनी रजनिश बहल यांच्याशी विवाह केला. रजनिश यांचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबध नव्हता. ते एक लेफटंन्टं नेव्ही कमांडर होते. पण याचा नुतन यांच्या फिल्मी करिअरवर काहीच परिणाम झाला नाही. त्यांच काम सुरूच होतं.

फॅमेली मॅनची पत्नी कशी झाली बॉलिवूड अभिनेत्री? पाहा साऊथस्टार प्रियामणीचा प्रेरणादायी प्रवास

संबंधित बातम्या

नुतन यांची विशेष चर्चा रंगली ती 60 च्या दशकात त्यांनी स्विमसुट परिधान करत चित्रपटात सिन दिल्यानंतर. त्या काळी स्विमसुट परिधान करणं हे मोठं धाडसी काम होतं. पण नुतन यांनी बिनधास्त हे आवाहन पेलत अगदी आत्मविश्वासाने स्विमसुट परिधान करून चित्रपटात सिन दिले होते. ‘दिल्ली का ठग’ अस या चित्रपटाचं नाव होतं. या अष्टपैलू अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत अनेक सुपरहीट चित्रपट दिले. ‘नगिना’, ‘हम लोग’, ‘सीमा’, ‘चंदन’ , ‘सौदागर’ या चित्रपटांचाही समावेश आहे. नुतन यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. अनेक दिवसांच्या या गंभीर आजारनंतर नुतन यांच 1991 मध्ये 21 फेब्रुवारीला निधन झालं.

नुतन आणि रजनिश यांचा मुलगा म्हणजेच अभिनेते मोहनिश बहल हे देखिल चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. 90 च्या दशकात अनेक हिट चित्रपटांत ते दिसले होते. त्यांची मुलगी प्रनुतन बहल हिने देखिल बॉलवूडमध्ये नोटबूक या चित्रपटातून पदार्पण केलं आहे. मोहनिश हे सोशल मीडियावर आपल्या आईच्या अनेक आठवणी शेअर करत असतात. तसेच त्यांच्या चित्रपटातील काही क्लिप्सही ते चाहत्यांसाठी पोस्ट करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या